आरोग्य

100 अंड्यांच्या बरोबरीचा आहे हा व्हेज पदार्थ, आहारात करा समावेश, वयाची नव्वदीतही ठणठणीत…


धाकधुकीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांनी आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचे सेवन करणे कमी केले आहे, ज्यामुळे फार कमी काळात लोक अनेक आजरांनी ग्रासलेले असतात.

आपल्या शरीराला प्रथिने, कर्बोदके, खनिजे अशा पोषक घटकांची गरज असते. अंडी, मांस, आणि मासे हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहेत मात्र शाकाहारी लोक याचे सेवन करू शकत नाहीत. अशावेळेस मूग डाळ तुमच्यासाठी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत ठरू शकतो.

मूग डाळ ही केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर त्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. ज्यामुळे मूग डाळ ही शाकाहारी आहारातील एक महत्त्वाचा घटक ठरते. आज आपण या लेखात मूगडाळ शाकाहारी लोकांसाठी किती सर्वोत्तम आहे आणि याचे फायदे काय याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

 

मूग डाळीमध्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत आढळून येतो. एका कप मूग डाळीत सुमारे 14-16 ग्रॅम प्रथिने असतात, जी शाकाहारी लोकांसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांचा मोठा भाग पूर्ण करू शकते. याबरोबरच मूग डाळीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळली जातात, ज्यामुळे पौष्टिक आहारात मूग डाळीचा मुख्यत्त्वे समावेश होतो. यामध्ये फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि जीवनसत्त्व B6 यांसारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. शाकाहारी आहारातून पोषक तत्त्वांची कमतरता जाणवू शकते अशात मूग डाळीचे सेवन फार फायद्याचे ठरते. यामुळे शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक पुरवली जातात.

मुगाची डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे कार्य सुधारते. शाकाहारी आहारात अनेकदा हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले घटक कमी पडू शकतात मात्र याची कमतरता मुगाची डाळ उत्तम रित्या भरून काढू शकते. नियमित मुग डाळ सेवन केल्याने हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते.

मुगाची डाळ पचनाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानली जाते. अनेकदा काही प्रथिनेयुक्त पदार्थ पचनासाठी जड ठरू शकतात, ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. मात्र मूग डाळ ही हलकी आणि पचनास फार सोपी असते. मुगाच्या डाळीत असलेल्या फायबर्समुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते आणि पोटाचे विकार दूर राहतात. नियमितपणे मुगाच्या डाळीचे सेवन केल्यास गॅस्ट्रिकची समस्या कमी होते आणि पचन तंत्र सुधारण्यास मदत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button