आरोग्य

रात्री सतत लघवीला उठताय? ‘या’ 5 आजारांमुळे होतोय त्रास


सतत लघवीला होणे याला Nocturia असे म्हटले जाते. आरोग्याशी निगडीत ही गंभीर समस्या म्हणूनही ओळखली जाते. यामुळे अनेकदा रात्रीची झोप मोड होते. लघवीची ही लक्षणे तुमच्या शरीरात बिघाड झाल्याचं सांगतात.



कारण रात्रीची झोप नीट न लागणे हे देखील आजारांना निमंत्रण देणारे लक्षण आहे. अशावेळी 5 आजारांची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे.

डायबिटिस

रात्री झोपेत सतत लघवीला होणे, झोप नीट न लागणे हे डायबिटिस असल्याचं दर्शवतं. टाइप 1 आणि टाइप 2 चा डायबिटिस असल्यास रात्री लघवीला सतत उठावे लागते. तुमच्या शरीरात जास्तीची साखर तयार होत असल्यामुळे शरीरात असा बदल होत असल्याचं डॉक्टर सांगतात.

किडनी स्टोन

किडनी स्टोनमुळे देखील रात्रीची झोप मोड होते आणि सतत लघवीला जावे लागते. यावेळी तुम्हाला सहन न करता येणारा त्रास होतो. एवढंच नव्हे तर यामुळे देखील रात्री सतत लघवीला जावे लागते. जर पोट दुखी आणि सतत लघवीला होणे हे कॉम्बिनेशन असेल तर मुतखड्याचा लक्षण असल्याचं दर्शवते.

प्रोस्टेट

पुरुषांना वारंवार लघवीला होत असेल तर ही समस्या प्रोस्टेटमुळे जाणवते. ज्याला सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (BPH) असेही म्हणतात. या स्थितीमुळे मूत्रमार्ग संकुचित होऊ शकतो आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे करणे कठीण होऊ शकते. यामुळे वारंवार लघवी होऊ शकते, हा शारीरिक बदल रात्रीचा सर्वाधिक प्रमाणात जाणवतो.

UTI चा त्रास

UTIs मुळे लघवी करताना वारंवार थांबून लघवीला होणे आणि वेदना किंवा जळजळ होऊ शकते. ही लक्षणे रात्रीच्या वेळी अधिक स्पष्ट होतात. जननेंद्रियांमध्ये वेदना, जळजळ आणि दुर्गंधीयुक्त योनिमार्गामधील हा त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या.

हार्टशी संबंधित आजार

जर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार असतील तर रात्री सतत लघवीला होण्याची समस्या निर्माण होते. काही रुग्णांमध्ये हे विशेष लक्षण आढळले आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असते.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘ लोकशाही न्युज24’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button