क्राईम

शिक्षकाकडून 14 वर्षीय विद्यार्थीनीवर 5 महिने अत्याचार, बेशुद्ध पडताच झालं ..


Crime News : नालासोपारा -बदलापूर प्रकरणानतंर नालासोपाऱ्यातील शिक्षकाने विद्यार्थीनीवर केलेल्या बलात्कार प्रकरणात १० दिवसांनी कारवाई करण्यात आलीय. संतोष भवनच्या यादवेश विकास इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नालासोपारा पूर्व इथल्या शाळेत आरोपी अमित दुबे या शिक्षकाने मार्च ते जुलै असे पाच महिने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. त्याने २०२२ मध्येही पीडित मुलीचा छळ केला होता.

पीडित मुलीने शिक्षकाबद्दल शाळेतील इतर शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. जेव्हा पीडित मुलीचा भाऊ याबाबत जाब विचारण्यासाठी गेला तेव्हा भावालाच मारहाण करण्यात आली. शाळेने वेळीच कारवाई केली असती तर बहिणीवर अत्याचार झाले नसते असं पीडितेच्या भावाने म्हटलंय.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी अमित दुबे (३०) हा नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथील यादवेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षक आहे. या शाळेत शिकणार्‍या १४ वर्षाच्या विद्यार्थिनीला धमकावून तिच्या शाळेत तसेच शिकवणी वर्गात बलात्कार करत होता. ५ महिने तो या विद्यार्थीनीवर बलात्कार करत होता. एकदा मुलगी वर्गात बेशुद्ध पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शिक्षक जेव्हा या मुलीला त्रास देत होता तेव्हा त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे तक्रार केली होती मात्र त्यांनी गप्प राहण्यास सांगितले असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला.

 

२५ हुन अधिक मुलींचे लैंगिक शोषण?

शाळेबाहेर संतप्त पालकांनी आंदोलन देखील केले होते.यापूर्वी शाळेतील २० ते २५ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला. शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी पडली असून तिने शाळा सोडल्याचे त्याने सांगितले. माझ्या बहिण शाळेत बेशुध्द पडली मात्र शाळेने प्रकार दडवला आणि आरोपींना पाठीशी घातले, असा आरोप भावाने केला आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button