क्राईम

Sexual Abuse: बनावट NCC कॅम्प घेऊन 13 शालेय विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण


Crime News : महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी लैंगिक शोषण, अत्याचाराच्या गंभीर घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्वात आधी सरकाने महिला सुरक्षा योजनेवर काम करायला हवे, अशी जोरदार मागणी होतेय.



कोलकाता येथील रुग्णालयातील धक्क्याने देश अजून सावरला नाहीय. त्यात आता तामिळनाडूमधून प्रकार समोर आलाय. अशा प्रकारांमुळे आपली मुलगी सुरक्षित आहे का? याची काळजी विद्यार्थीनींच्या पालकांना कायमची सतावत राहीलं. या घटनांना वेळीच आळा बसण्याची गरज पालक वर्गातून व्यक्त होत आहे.

 

13 मुलींसोबत  शोषण

 

तामिळनाडूच्या कृष्णगिरीमध्ये एका एनसीसी कॅम्पमध्ये काही मुलींना नको त्या घटनेचा सामना करावा लागला. घटनेची चौकशी करायला गेल्यावर हा बनावट एनसीसी कॅम्प होता अशी माहिती समोर आली आहे. या ठिकामी 13 मुलींसोबत लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. आर.जी केळकर मेडीकल कॉलेज आणि रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरची बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या दरम्यान ही घटना उजेडात आली आहे. महाराष्ट्रात बदलापुरमध्ये 2 गतीमंद मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटनादेखील समोर आली आहे.

पोलिसांकडून अटक आणि तपास

तामिळनाडू पोलिसांनी घटनेची कसून चौकशी केली. यानंतर एनसीसी कॅम्पचे आयोजक, शाळेचे मुख्याध्यापकांसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 2 शिक्षक आणि एका पत्रकाराचादेखील समावेश आहे. खासगी शाळेकडे एनसीसी कॅम्पचे कोणतेच यूनिट नव्हते. आयोजकांनी शाळेला चुकीची माहिती देऊन बनावट एनसीसी कॅम्पचे आयोजन केले होते, अशी माहिती समोर आली.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 दिवसीय एनसीसी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये 17 मुलींचा समावेश होता. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मुलींना ऑडिटोरीयममधून बाहेर नेलं जायचं आणि त्यांचे लैंगिक शोषण केले जायचे. येथे कॅम्पची देखरेख करायला कोणी शिक्षक नव्हता, असे वास्तवही पुढे आले आहे.

कारवाईची मागणी

या प्रकरणानंतर पीडित मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. जिल्हा बाल कल्याण समितीने यावर कारवाई सुरु केली आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक शौषणाची माहिती शाळा अधिकाऱ्यांना होती. पण त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवली नाही,अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस प्रमुख थंगादुरई यांनी दिली.

संभाव्य रॅकेटचा तपास

खोटे एनसीसी कॅम्प भरवण्याच्या या प्रकरणात कोणता ग्रुप तर नाहीना? या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. इतर शाळांमध्ये असे कॅम्प आयोजित केले जातात का? हे तपासले जाणार आहे. याप्रकरणातील दोषींवर बाल संरक्षण (POCSO) अधिनियमांच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूर, कळव्यातही धक्कादायक प्रकार

कोलकात्यात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातल्या रुग्णालयांतही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना कळव्यात घडलीय. बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलंय.दुसरीकडे कळवा रुग्णालय परिसरात एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. याप्रकरणी आरोपी प्रदीप शेळकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.आज त्याला कोर्टात हजर करणार आहे .विशेष म्हणजे कळवा रुग्णालयात cctv आहेत मात्र कळवा रुग्णालयाच्या आवारात cctv नसल्याचं उघड झालंय. कळवा पोलीस या बाबत, रुग्णालय प्रशासनाला cctv लावा असं पत्र देणार आहेत.दरम्यान या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटताहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button