ताज्या बातम्या

दर्शनासाठी सहकुटुंब आला.. अन् शितकड्यावरुन घेतली उडी…


Crime News : वणी – श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर कुटुंबासमवेत दर्शनासाठी आलेल्या वडनेर भैरव, ता. चांदवड येथील तरुणाने शीतकड्यावरुन खोल दरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

 

श्रावण पौर्णिमा निमित्त श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर श्री भगवतीच्या दर्शनासाठी दत्तात्रय रामभाऊ तिडके, वय 36 वर्षे, रा.वडनेर भैरव ता. चांदवड हे आज सकाळी ४ वाजेच्या सुमारास कुटुंबासमवेत गडावर आले होते. (young man take extreme step at saptashrungi gad )

 

दरम्यान त्याने सकाळी साडे पाच वाजेेेेच्या सुमारास अज्ञात कारणास्तव सप्तश्रृंगी गडाचे शितकड्यावरुन खोल दरीत उडी मारली. याबाबतची माहिती वणी पोलिसांना मिळताच शितकड्याच्या पायथ्याशी भातोडे, ता. दिंडोरी शिवारातील पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला असता. ८०० ते ९०० फुट खोल दरीत दत्तात्रय तिडके यांचे प्रेत मिळून आले.

 

याबाबत चेतन सुरेश डंबाळे, रा. कोकण टेंभी, वडनेर भैरव यांच्या खबरीवरुन वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, पोलिस हवालदार व्ही. जी. साबळे करीत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button