क्राईम

Beed Crime :बीड विद्यार्थिनीला जबरदस्ती गाडीवर बसवून शहारातील लॉजवर नेले व केला बलात्कार


Beed Crime : बीडच्या माजलगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लॉज वर नेवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपी मोकाट आहेत. तसेच आरोपीकडून पीडितेच्या कुटुंबाला केस परत घ्या अन्यथा ठार मारू अशी धमकीही दिली आहे. त्यामुळे आरोपी मोकाट असल्याने मुलीचं शिक्षण बंद करण्याची वेळ कुटुंबावर आली. आता पीडितेच्या आईने थेट मुख्यमंत्र्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना राबविणारे सरकार आता भाचीला सुरक्षा आणि न्याय देणार कां? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या माजलगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत 6 जून रोजी नववीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपीने तिली गाडीवर बसवून माजलगाव शहारातील अतिथी लॉजवर नेले व तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितलं तर जीवे मारीन अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडित मुलीने याबाबत कुणालाच काहीच सांगितले नाही.

पीडित मुलीने शाळा सुरु झाल्यावर शाळेत जायला नकार दिला, यावेळी आईने कारण विचारले तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने म्हटले की, ‘4-5 मुलांनी मला गाडीवर बळजबरीने बसवून लॉजवर नेवून अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला शाळेत जायला भीती वाटत होती. माझ्यावर एकाने अत्याचार केला पण लॉजवर साथ देणारे तिघेजण होते. सर्वजण एकाच रूम मध्ये होते.’

यानंतर आई मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली व 30 जून रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहे. तो पीडितेच्या कुटूंबाला मिटवून घ्या अन्यथा तुमच्या मुलीला उचलून नेवू अशा धमक्याही देत आहे. याबर बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी, हे प्रकरण सामुहिक बलात्काराचे आहे. त्यामुळे इतरांवरही गुन्हा दाखल करावा. आरोपीला अटक केली नाही तर पोलीस स्टेशनला घेराव घालण्याचा इशाराही पोटभरे यांनी दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्छा यांनी सांगितले की, ‘आरोपीला अटक करण्यासाठी आमच्या टीम पाठवल्या आहेत. कॉल डिटेल्स तपासली जात आहे. या लॉजवरही कारवाई केली जाईल.’ दरम्यान, या प्रकरणामुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालून लाडक्या भाचीला न्याय देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button