लोकशाही विश्लेषण

मृतदेहावर सामूहिक बलात्कार, 2 प्रियकरांच्या मदतीने काढला पत्नीचा काटा; नेमक घडलं काय?


अनैतिक संबंधांतून गुन्हे होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पश्चिम चंपारणमधल्या योगपट्टीतल्या माछरगाव नगर पंचायत परिसरात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने तिचा खून केला.



यासाठी त्याने पत्नीच्या पूर्वीच्या दोन प्रियकरांची मदत घेतली. खून केल्यांतर त्यांनी मृतदेहावर सामूहिक बलात्कार केला. नंतर मृतदेहाचा गळा चिरला आणि मृतदेह स्मशानात फेकून दिला. या खळबळजनक घटनेचा पोलिसांनी पर्दाफाश करून आरोपींना अटक केली आहे. अनैतिक प्रेमसंबंधांमुळे हा खून झाल्याची चर्चा आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणातल्या पाचही आरोपींना अटक केली आहे. या घटनेत पीडितेचा पती, दीर, दोन पूर्वीचे प्रियकर आणि एका तरुणीचा समावेश आहे.

पोलीस स्टेशन प्रभारींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे पूर्वी राहुल नावाच्या ड्रायव्हरशी प्रेमसंबंध होते. नंतर राहुलला सोडून तिने अखिलेश नावाच्या आणखी एका ड्रायव्हरशी सूत जुळवलं. राहुलच्या मनात याबाब राग होता. दरम्यान, राहुलचं प्रीती नावाच्या तरुणीशी प्रेमप्रकरण सुरू झालं. या प्रीतीने अखिलेश आणि पीडित महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून दिला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून ही महिला अखिलेशला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होती. त्यामुळे अखिलेशच्या मनातदेखील तिच्याबद्दल राग होता.

महिलेचा पती आणि दीरदेखील तिच्या अनैतिक संबंधांमुळे त्रस्त होते. शनिवारी रात्री महिलेचा पती, दीर, राहुल आणि अखिलेश यांनी माछारगाव-देवराज रस्त्यावरच्या शायरी माई मंदिराजवळ एका अर्धवट बांधलेल्या दुकानात मटण आणि दारूची पार्टी केली. तिथेच चौघांनी या महिलेच्या खुनाचा कट रचला. पतीच्या सांगण्यावरून अखिलेशने तिला घराशेजारच्या बागेत बोलावलं. ती बागेत गेली असता प्रीतीही तिच्या मागे गपचूप तिथे आली.

चौघाही पुरुषांनी महिलेला बेदम मारहाण केली आणि गळा दाबून तिचा खून केला. नंतर चौघांनी महिलेला ऊसाच्या शेताजवळच्या स्मशानभूमीत नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर राहुलने चाकूने तिचा गळा चिरला. घटनेनंतर चौघे पुरुष आणि प्रीती आपापल्या घरी गेले. सकाळी ग्रामस्थांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलीस व कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिसांनी महिलेचा पती, दीर, राहुल कुमार, प्रीती कुमारी आणि अखिलेश बारी यांना अटक केली आहे. सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button