क्राईमछत्रपती संभाजीनगर

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून एका विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर अत्याचार


Crime News : लग्नाचं आमिष दाखवून एका विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर शहरातील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे



याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर वरूण बाळासाहेब गवळी असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे. त्याने या महिला डॉक्टरला लग्नाचं आमिष दाखवलं. यानंतर चक्क दारू पाजून एका नामांकित हॉटेलमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका खाजगी रुग्णालयात फिर्यादी महिला आणि आरोपी डॉक्टर नोकरी करत होते. काही काळानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आरोपी डॉक्टरने महिला डॉक्टरला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी अत्याचार केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button