क्राईम

Crime News : खोली नंबर 103, महिला प्रोफेसरचा मृतदेह, युनिवर्सिटीच्या गेस्ट हाऊसमध्ये त्या रात्री काय घडलं?


Crime News : युनिवर्सिटीमध्ये एका महिला प्रोफेसरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांच्या मते ही आत्महत्या आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्याशिवाय पुढची कारवाई करणार नाही असही पोलिसांच म्हणणं आहे.



युनिवर्सिटी गेस्ट हाऊसच्या खोली नंबर 103 मध्ये महिला प्रोफेसरचा संशायस्पद स्थितीत मृतदेह मिळाला आहे. खोलीमधून चाकू आणि औषध पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील हे प्रकरण आहे.

महिला प्रोफेरसरचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत प्रोफेसर दोन आठवड्यांपूर्वी तीर्थंकर महावीर युनिवर्सिटीमध्ये जॉईंन झाली होती. महिला प्रोफेसरच्या रुमचा दरवाजा सकाळी उघडला नाही. त्यावेळी गेस्ट हाऊसकडून युनिवर्सिटी मॅनेजमेंटला माहिती देण्यात आली. घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक बोलवण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा उघडला, तेव्हा महिला प्रोफेसरचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. फॉरेंसिक टीमने घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले.

 

सकाळी दरवाजा उघडला नाही

 

पोलिस अधीक्षक नगर अखिलेश भदोरिया यांनी माहिती देताना सांगितलं की, “तीर्थंकर महावीर युनिवर्सिटीत टीएमयू पॅथोलॉजी डिपार्मेंटमध्ये तैनात प्रोफेसर अदितीचा मृतदेह मिळाला. मृत प्रोफेसर रेवाडी जिल्ह्यात रहायला होती. सकाळी दरवाजा उघडला नाही, त्यावेळी युनिवर्सिटी मॅनेजमेंटला कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा रुममध्ये मृतदेह जमिनीवर पडलेला होता”

 

शनिवारी रात्री त्या जेवल्या सुद्धा नव्हत्या

 

प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार वाटतोय. घटनास्थळी काही औषध आणि चाकू सापडला आहे. प्रोफेसरने स्वत:वरच हल्ला केलाय असं वाटतय. युनिवर्सिटी स्टाफनुसार एक-दोन दिवसांपासून प्रोफेसरची तब्येत खराब होती. शनिवारी रात्री त्या जेवल्या सुद्धा नव्हत्या.

 

‘तेव्हा ती खूप आनंदी होती’

 

मृत प्रोफेसर आदितीचे नातेवाईक नवनीत कुमार बोलले की, ‘अदिती टीएमयूमध्ये जॉईंन झाली, तेव्हा ती खूप आनंदी होती’ ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतेय, ते खूप चांगलं आहे, असं तिने सांगितल्याच नवनीत कुमार म्हणाले. अदिती आधी हापुडच्या मेडीकल कॉलेजमध्ये होती.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button