Beed News : बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; नागरिकांना जागून काढावी लागतीये रात्र

Beed Crime : बीड शहरातल्या अंकुश नगर आणि नाथ सृष्टी परिसरात चोरट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. मागील आठवड्यात अंकुश नगर भागातील नागरिकांनी करपरा नदी पुढाकार घेत स्वखर्चाने स्वच्छ केली.
कारण याच नदीत दबा देऊन चोरटे बसलेले असतात. मात्र तरी देखील चोरट्यांचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या चोट्यांच्या भीतीने नागरिक स्वतः गस्त घालून रात्र जागून काढत आहेत.
दरम्यान अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी मध्यरात्री या परिसरास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. तर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी करणार असल्याचे देखील क्षीरसागर यांनी सांगितल. तर याच भागात एक पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांसह योगेश क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.