Crime News : बुऱ्हऱ्हाडी हत्याकांडाची पुनरावृत्ती; तीच तारीख, तीच पद्धत काय घडले नेमके ?
Crime News : मध्य प्रदेश – सहा वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये बुराडी हत्याकांड घडले होते. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला होता. आजही ते प्रकरण आठवलं तरी अंगावर शहारे येतात. पण याप्रकरणाशी जुळणारी घटना मध्यप्रदेशातून समोर आली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा देश हादरला आहे. धक्कादायक म्हणजे तोच दिवस, तीच पद्धत अगदी सगळं सारखंच बुराडी हत्याकांडाप्रमाणे…
काय घडले नेमके?
मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे एकाच घरात पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश व्यास घटनास्थळी पोहोचले. ही हत्या की सामूहिक आत्महत्या? एफएसएल आणि शवविच्छेदन अहवालानंतरच हे स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस स्टेशन हद्दीतील रावडी गावात ही घटना घडली. मृतांमध्ये घराचा प्रमुख राकेश, त्याची पत्नी ललिता आणि मुलगी लक्ष्मी, दोन मुलं अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाचा खून झाल्याची भीती नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेने दिल्लीतील बुराडी हत्याकांडाची आठवण करून दिली.
काय होते बुराडी हत्याकांड?
दिल्लीतल्या बुऱ्हाडी हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 1 जुलैला दिल्लीत हे हत्याकांड झालं होतं, याला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. 30 जून 2018 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चुंडावत कुटुंबतील तब्बल 11 जणांनी आत्महत्या केली होती.यातली दहा लोकं गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले होते. तर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या आजीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. 1 जुलै 2018 च्या सकाळी 11 मृतदेह ताब्यात घेण्यात आले. बुऱ्हाडी हत्याकांड नेमकं का घडलं यावर अनेक तर्कवितर्क लढवण्यात आलं. कुटुंबातील प्रमुख ललित भाटिया यांनी जादू-टोणाच्या आहारी जाऊ संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करण्यासाटी मजबूर केलं असा दावा केला जात आहे. बुऱ्हाडी हत्याकांडावर बेवसीरिजदेखील आली आहे.