जलजिवनच्या कामात बोगस गिरी;पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे अधिकारी, इंजिनिअर निलंबित करण्यासह चौकशीची विशाल सराफ यांची मागणी
जलजिवनच्या कामात बोगस गिरी;पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे अधिकारी, इंजिनिअर निलंबित करण्यासह चौकशीची विशाल सराफ यांची मागणी
अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा.!
Beed News : बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे.धारूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाला आहे.धारूर तालुक्यातील गोपाळपुर ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या जलजीवन मिशन योजनेत देखिल कोट्यावधीच्या कामातही सध्या तसाच बोगसगिरीचा प्रकार सुरू आहे हे सगळं माहित असतानाही याकडे मुकुंद आंधळे कार्यकारी अभियंता(प्र)ग्रामीण.पाणीपुरवठा.विभाग, जि.प,बीड व ए.एस.शेख उप अभियंता, ग्रामीण.पाणीपुरवठा विभाग.जि.प बीड, धारूर तालुका अधिकारी, धारूर तालुक्यातील जलजिवनचे इंजिनिअर कुंभार चौकशी करून यांच्यावर निलंबनाची कारवाईसह अनेक प्रश्न सोडविण्याची मागणी विशाल सराफ यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. अन्यथा मंत्रालय कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असून भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर व गुत्तेदारावर इंजिनिअर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.जलजिवनच्या कामाचा बीड जिल्ह्यात बोगस गिराचा डंका वाजत असताना मुकुंद आंधळे कार्यकारी अभियंता(प्र)ग्रामीण.पाणीपुरवठा.विभाग, जि.प,बीड व ए.एस.शेख उप अभियंता, ग्रामीण.पाणीपुरवठा विभाग.जि.प बीड व संबंधित अधिकारी बीड जिल्ह्यातील गुत्तेदार पोषण्याचे काम करत आहेत, व होत असलेल्या जलजीवन योजनेमध्ये भष्टाचार्यारा कडे दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.तसेच धारूर तालुक्यातील जलजिवनचे इंजिनिअर कुंभार, धारूर तालुका अधिकारी यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी.पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे विशाल सराफ यांनी मागणी केली आहे.अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असलेला इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.विशाल सराफ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते , हनुमंत तोंडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस,बीड यांच्या निवेदनावर साक्षर्या आहेत.
फसवणूकीचा गुन्हा दाखल करा..
गोपाळपूर जलजिवनचे देयके अदा न करण्यात यावे.संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.गोपाळपूर जलजिवनच्या संबंधित इंजिनियर, गुत्तेदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.संबंधित सह्याद्री कंट्रक्शन चे शासकीय लायसन रद्द करण्यात यावे.गोपाळपूर जलजिवनची पाईपलाईन इस्टिमेट प्रमाणे नसून एक मीटर खोलीकरण नसल्यामुळे संपूर्ण पाईपलाईन करून दाखवण्यात यावे.गोपाळपूर जलजिवनची विहीर बांधकाम व पिण्याच्या पाण्याची टाकी वाळू येवजी विको चा वापर करून बांधण्यात येत आहे त्यामुळे तात्काळ बांधकाम थांबवण्यात यावे.पाणीपुरवठा विभागाचे, जलजीवनच्या संबंधित जिल्हा परिषद बीड चे अधिकारी निलंबित करण्यात यावे.अशी मागणी निवेदनाद्वारे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.