शेत-शिवार

Pineapple Cultivation : अननसाची लागवड कशी केली जाते?

Agriculture : जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अननस फळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. अननस हे पीक थंड तापमानास संवेदनशील असते.

लागवड करण्यासाठी फुटवे, फळाचा मूळ दांडा व पाने यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून लागवड केली जाते.

तसेच फळ तयार झाले म्हणजे मुख्य बुंध्याच्या आसपास जमिनीत असलेल्या बुंध्यापासून पुष्कळ अंकुर किंवा फुटवे निघू लागतात. त्यापासून अननसाची अभिवृद्धी केली जाते.

  • अननस लागवड
    – अननस लागवडीच्या सुरवातीला जमिनीची खोलवर नांगरणी करून शेणखत मिसळून आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश करून माती तयार करावी.
    – जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मातीचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी झाडांभोवती पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
    – अननसाची लागवड वर्षभर केली जाते. परंतु मे ते जुलै या महिन्यात लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.
    – अननसाची लागवड रोपांद्वारे केली जाते. रोपे ५ ते ६ महिने जुनी असावीत. या पिकाची लागवड चरात केली जाते.
    – त्यासाठी ३० सें.मी. खोलीचे तीन ते चार मीटर लांब चर तयार करावेत.
    – दोन चरांतील अंतर ९० सें.मी. ठेवावे. चरातील दोन रांगांतील अंतर ६० सें. मी. ठेवावे. दोन झाडांतील अंतर २५ सें.मी. ठेवावे. विरळ लागवडीमध्ये हे अंतर ३० ते ४५ सें.मी. पर्यंत ठेवावे.
    – लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यात माती जाणार नाही याची काळजी घ्यावी.
    – ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांच्या कालावधीत लागवड करावी. लागवड करताना रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत.
    – अति पावसात लागवड करणे टाळावे. लागवड केल्यानंतर रोपांचे चांगले संरक्षण करणे आवश्यक असते.
    – अननस मल्चिंग पेपरवर लावल्याने मुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास, तणांवर नियंत्रण ठेवण्यास आणि जमिनीचे तापमान राखण्यास मदत होते

जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अननस फळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. अननस हे पीक थंड तापमानास संवेदनशील असते.

लागवड करण्यासाठी फुटवे, फळाचा मूळ दांडा व पाने यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून लागवड केली जाते.

तसेच फळ तयार झाले म्हणजे मुख्य बुंध्याच्या आसपास जमिनीत असलेल्या बुंध्यापासून पुष्कळ अंकुर किंवा फुटवे निघू लागतात. त्यापासून अननसाची अभिवृद्धी केली जाते.

अननस लागवड
– अननस लागवडीच्या सुरवातीला जमिनीची खोलवर नांगरणी करून शेणखत मिसळून आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश करून माती तयार करावी.
– जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मातीचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी झाडांभोवती पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
– अननसाची लागवड वर्षभर केली जाते. परंतु मे ते जुलै या महिन्यात लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.
– अननसाची लागवड रोपांद्वारे केली जाते. रोपे ५ ते ६ महिने जुनी असावीत. या पिकाची लागवड चरात केली जाते.
– त्यासाठी ३० सें.मी. खोलीचे तीन ते चार मीटर लांब चर तयार करावेत.
– दोन चरांतील अंतर ९० सें.मी. ठेवावे. चरातील दोन रांगांतील अंतर ६० सें. मी. ठेवावे. दोन झाडांतील अंतर २५ सें.मी. ठेवावे. विरळ लागवडीमध्ये हे अंतर ३० ते ४५ सें.मी. पर्यंत ठेवावे.
– लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यात माती जाणार नाही याची काळजी घ्यावी.
– ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांच्या कालावधीत लागवड करावी. लागवड करताना रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत.
– अति पावसात लागवड करणे टाळावे. लागवड केल्यानंतर रोपांचे चांगले संरक्षण करणे आवश्यक असते.
– अननस मल्चिंग पेपरवर लावल्याने मुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास, तणांवर नियंत्रण ठेवण्यास आणि जमिनीचे तापमान राखण्यास मदत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button