क्राईम

crime news :मुलं शाळेत, नवरा कामावर; घरात कोणी नाही पाहून बॉयफ्रेंड घरी आला अन् विवाहित गर्लफ्रेंडसोबत..


Crime news : मुलं शाळेत, नवरा कामावर; घरात कोणी नाही पाहून बॉयफ्रेंड घरी आला अन् विवाहित गर्लफ्रेंडसोबत…, विरारमधील घटना



पालघर जिल्ह्यातील विरार (पूर्व) येथे एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (24 जून) उघडकीस आली आहे.

धनश्री अंबादासकर असं या विवाहित महिलेचे नाव आहे. प्रियकर शेखर कदम याने गळा दाबून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार घरात कुणीच नसल्याचे पाहून आरोपी शेखर घरात शिरला आणि दोघात बाचाबाची झाली. तिला चक्कर आल्याचे सांगून तो तिला रुग्णालयात घेऊन गेला अन् डॉक्टरांनी धनश्रीला मृत घोषित केले.

या प्रकरणातील मृत महिला धनश्री अंबाडस्कर (वय ३२) ही आपल्या दोन मुली आणि पती रुपेशसह विरारमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी रुपेश कामाला गेला. तर दोन मुली ही शाळेत गेल्या. त्यामुळेच धनश्री घरी एकटीच होती.

 

त्यानंतर दुपारच्या वेळेत धनश्रीचा प्रियकर शेखर घरी आला. धनश्री आणि शेखर हे दोघे गेल्या ५-६ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. धनश्रीला शेखरसोबत लग्न करायचे होते. यावरुन दोघात वारंवार खटके उडायचे. सोमवारी नेहमीप्रमाणे दोघांमध्ये वाद झाला. शेखर संतापला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या प्रेयसी धनश्रीचा गळा आवळला. जीव वाचवण्यासाठी धनश्री धडपड करू लागली. पण शेखर काय थांबला नाही. साडीने तिचा गळा आवळला.

घरी असलेल्या शेखरने बनाव रचला आणि धनश्रीची प्रकृती खलावल्याचं सांगत तिला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. धनश्रीचा पत्नी रुपेशला फोन करून तसं कळवण्यात आलं. त्यानंतर त्याच्यातर पायाखालची जमीनच सरकली.

या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास सुरु केला त्यावेळी शेखरचा बनाव उघड झाला. पोलिसांनी खाक्या दाखवताच शेखरने सत्य घटना सांगितली. शेखर एक रिक्षाचालक असून त्याचा या लग्नाला विरोध होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button