क्राईम

सेक्स रॅकेट ! 25 हजारात मुलींचा सौदा, गिऱ्हाईक बनून पोलिसांनी…


crime news ठाणे : ठाण्यातून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात थायलंडच्या काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. विदेशी दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

प्रकरणातील दलाल महिलेला 25 जूनपर्यंत पोलीस कोठीडत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. वागळे इस्टेट भागातील लुईसवाडीत सर्व्हिस रोडलगतच्या एका हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने 21 जूनला हॉटेलमध्ये धाड टाकली.

एका बोगस गिऱ्हाईकाच्या मदतीने विदेशी तरुणींची मागणी करण्यात आली. त्यावेळी दलाल विदेशी महिलेनं थायलंडच्या तीन मुलींना तिथे आणलं . या दलाल महिलेनं एका मुलीसाठी 25 हजारांचा सौदाही ठरवला. या मुलींच्या सौद्यानंतर गिऱ्हाईकाने इशारा देताच पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दलाल महिलेला अटक केली.

यानंतर 30 ते 35 वयोगटातील थायलंडच्या तीन पीडित तरुणींची सुटका केली. दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांना मुंबईतील रेस्कू फाउंडेशन या महिला बाल सुधारगृहात ठेवलं आहे. या महिला मुंबईतील जुहू भागात वास्तव्याला आहेत. पोलीस सध्या या प्रकरणात विविध बाबींचा तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button