Laxman Hake: मराठा समाज शासनकर्ता.. लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना ‘कायदा’ सांगितला !
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला. तसेच कुणबी नोंदी देखील रद्द करा, अशी मागणी हाके यांनी केली.
सरकारने या दोघांना देखील आश्वासन दिलं असून खरा पेच आता निर्माण झाला आहे. राज्य सरकार काय निर्णय घेतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठाच कुणबी असल्याचे जरांगे म्हणतात मात्र असं म्हणणे म्हणजे मुर्खपणा असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.
लक्ष्मण हाके म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती एम एच मार्लापार्ले यांचे एक जेजमेंट आहे ते सर्वांची वाचले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. न्यायमुर्ती मार्लापर्ले यांचं हे स्टेटमेंट आहे. याचा अभ्यास करावा. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासंदर्भात जे जेजमेंट दिलं आहे. त्याचा देखील अभ्यास करावा. ७५० पानांचे जेजमेंट आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीचा आढावा. कोण मागास, कोण प्रगत, नेमकी परिस्थिती काय आहे? हे सर्व जेजमेंटमध्ये आहे.
तुम्ही थेट पत्रक देता. मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांनी काल पत्र दिलं. कायदा बनवायला जाणाऱ्यांनी कायद्याची थोडीफार माहिती घेतली नसेल तर हे फार धोकादायक असल्याचे हाके म्हणाले.
लक्ष्मण हाके म्हणाले, छगन भुजबळांच्या वक्तव्याच्या मनोज जरांगे पाटील काय अर्थ काढणार हे त्यांनाच माहिती. ते काहीही बोलू शकतात. झुंडशाही करून आरक्षण मागणे चुकीचे आहे. देशात कायदा सुव्यवस्था आहे.
ओबीसींनी कधीही कायदा हातात घेतला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. कधी दंगल केली नाही, उठाव केला नाही, संघटीत होऊन कुणाच्या मालमत्तेचं नुकसान केलं नाही. ओबीसी हा शोषित, वंचित आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत. गावगाड्यापासून समाजव्यवस्थेपासून दूर पडणारे आहेत. ते आजही निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत. त्यामुळे दंगल होणार असं म्हणणे म्हणजे बाशिलपणाचे वक्तव्य आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली.
मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानूसार मराठा समाज शासनकर्ती जमात आहे. कुणाचे मागासलेपण तपासायचं असेल तर त्या समाजाचे शिक्षण,नोकरी, विधानसभा, लोकसभा पंचायत राजमधील तसेच सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्व तपासले जाते. हे तपासून एखादा समाजला तुच्छतेची वागणूक दिली जात असेल तर त्यांना मागास ठरवण्याचा अधिकार आहेत, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
निवडून गेलेले सर्व मराठे आहे. महाराष्ट्रातून लोकसभेत ओबीसीचे नेतृत्व देखील गेले नाही. यापूर्वी गोपीनाथ मुंडे होते. जातीय जणगणना करण्यासाठी संसदेला घेराव घालणारे ते एक नेते होते, अशी माहिती देखील लक्ष्मण हाके यांनी दिली.