लोकशाही विश्लेषण

तब्बल 10 वर्ष ‘या’ राशींवर असणार शनीची करडी नजर, साडेसातीचा पडणार प्रभाव; आत्तापासूनच सावधान…


ज्योतिषशास्त्रात, शनीला (Shani Dev) न्यायदेवता म्हटलं गेलं आहे. कर्मफळदाता शनी (Lord Shani)सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह आहे. शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा तर सर्व 12 राशींचं परिक्रमण पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो.

शनीची जेव्हा साडेसाती सुरु होते तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 2023 पासून शनी कुंभ राशीत विराजमान आहे. तो पुढच्या वर्षी संक्रमण करणार आहे. आता येणाऱ्या पुढच्या 10 महिन्यांत शनीची कोणत्या राशींवर (Zodiac Sign)करडी नजर असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

2025 मध्ये ‘या’ राशींवर शनीची साडेसाती

2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीचं संक्रमण होताच मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु होईल. तर, मीन राशीवर दुसरा चरण आणि कुंभ राशीच्या लोकांवर शेवटचा चरण सुरु होईल.

2038 पर्यंत ‘या’ राशींवर असणार शनीची साडेसाती

2025 मध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव साधारण 3 जून 2027 पर्यंत राहणार आहे. शनीने मीन राशीत संक्रमण करताच मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होईल. मेष राशीत शनीची साडेसाती तब्बल पाच वर्ष म्हणजेच 2032 पर्यंत असेल. तर, वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण 2027 मध्ये सुरु होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांवर 8 ऑगस्ट 2029 पासून शनीची साडेसाती सुरु होईल ती ऑगस्ट 2036 पर्यंत असणार आहे.

शनीच्या साडेसातीचा प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर मे 2032 पासून सुरु होईल जो 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत असणार आहे. अशातच 2025 पासून ते 2038 पर्यंत शनीची करडी नजर कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांवर असणार आहे.

‘या’ राशींची साडेसातीपासून होणार सुटका

2025 मध्ये मीन राशीत शनीने प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तर, कर्क आणि वृश्चिक राशीवर सुरु असलेली ढैय्या देखील या काळात समाप्त होईल.

टीप : वरील सर्व तपशील केवळ माहिती म्हणून लोकशाही न्युज24 वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button