क्राईमबीड

बीड खळबळजनक घटना ! पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाच्या बॅगमध्ये सापडली धक्कादायक वस्तू…


बीड : बीडमध्ये 170 जागांसाठी भरती प्रकिया होत आहे. यासाठी 8400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले . मात्र, आज सकाळी भरतीसाठी आलेल्या एक उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतलं.

यावेळी त्याने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बीडमध्ये पोलीस भरतीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी सुरु आहे. आज सकाळी मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ (वय-24) हा तरुण मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेऊन आला होता. पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली. यावेळी त्याच्या बॅगमध्येही उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन पोलिसांना आढळून आलं.

या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन काही उमेदवार वापरताना दिसतात.

महाराष्ट्रात 19 जून ते 28 जून अशी एकूण 10 दिवस पोलीस भरती प्रक्रिया चालणार आहे. सर्व भरती प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीत होत आहे. विशेष म्हणजे निकाल तात्काळ जाग्यावराच सांगितले जाणार आहेत. मात्र, अशातच आता बीडमधून ही धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button