बोटॅनिकल गार्डन, एन-8, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिम्मित आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
बोटॅनिकल गार्डन, एन-8, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिम्मित आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो व भारतीय योग संस्थान, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 21 जून रोजी बोटॅनिकल गार्डन, एन-8, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार, डॉ. भागवत कराड आणि डॉ. कल्याणराव काळे, युवा उद्योजक, अजिंक्य अतुल सावे, एमजीएम महागामी सांस्कृतिक संस्थेच्या पार्वती दत्ता, बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक प्रबंधक, किशोर बाबू, उपप्रादेशिक प्रबंधक, अतुल शिरके, भारतीय योग संस्थेचे उपप्रांत प्रधान, डॉ. उत्तम कळवणे, विभागीय प्रधान, संजय औरंगाबादकर, विभागीय मंत्री, आनंद अगरवाल, जिल्हा प्रधान, भाऊ सुरडकर, वर्षा देशपांडे, कैलास जाधव, सुरेश शेळके, विद्या ताकसांडे, वैजनाथ डोमाळे, श्रीकांत पत्की आदी उपस्थित होते.
यावेळी योग मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, योग प्रश्नमंजुषा आदीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन माधुरी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमात कैलास जाधव यांनी योग संबंधी प्रश्न विचारून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. भारतीय योग संस्थानच्या निर्मला कोकणे, विद्या कोकणे, विद्या राउत व सरस्वती गायकवाड यांनी साधकांकडून वेगवेगळे योग प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी जय हिंद ग्रुप, योगासन ग्रुप, एस पी ग्रुप, आबा-बाबा ग्रुप, सहयोग ग्रुप आदीचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सादिगले व भारतीय योग संस्थान, शाखा छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी, पदाधिकारी व साधक यांनी विशेष परिश्रम घेतले.