दुधावर साय कमी येत असली तरी तूप होईल भरपूर,दुधाच्या सायीत घाला ‘हा’ सिक्रेट पदार्थ, तूप बनेल दुप्पट…
घरांमध्ये दुधावर येणारी जाड साय रोज वेगळी काढून साठवली जाते. ही साय साठवून त्यापासून घरच्या घरी तूप बनवले जाते. या तुपाचा आपण रोजच्या जेवणात समावेश करतो. सणासुदीच्या वेळी गोड पदार्थ बनवताना किंवा रोज चपाती, भातासोबत तूप आवर्जून खाल्लं जात.
तूप खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. काही घरांमध्ये अजूनही तूप (Homemade Ghee) बनवले जाते. याउलट काहीजण तूप बनवण्याचे काम फारच वेळखाऊ व किचकट असल्याने बाहेरुन विकत आणतात. बाजारातून विकत आणलेल्या तुपाला घरच्या सारखी चव नसते(How to make Ghee from Malai at Home).
घरी तूप बनवण्याची योग्य पद्धत सर्वांनाच माहित असते असे नाही. अशावेळी तूप बनवताना काही चुका झाल्या तर तूप व्यवस्थित बनत नाही किंवा खराब होते. तूप बनवण्यासाठी दुधाच्या सायीचा वापर केला जातो. ही साय भरपूर प्रमाणांत साठवली जाते. काहीवेळा ही साय पातळ असते तर कधी साय कमी प्रमाणात असते. अशावेळी तूप नेमके कसे बनवावे असा प्रश्न पडतो. तूप बनवताना दुधाची साय कमी प्रमाणांत असली तरी त्यापासून जास्तीत जास्त तूप कसे बनवावे, यासाठी त्यात नेमका कोणता सिक्रेट पदार्थ घालावा ते पाहूयात(Tips & tricks how to extract more ghee from less cream or malai at home).
दुधाची साय कमी असली तरी त्यापासून भरपूर तूप बनवण्याची सोपी ट्रिक…
१. एका स्टिलच्या डब्यात आठवडाभर दुधाची साय जमवून ठेवा. ही साय रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित स्टोअर करुन ठेवावी. जेव्हा भरपूर साय जमा होईल तेव्हा ती रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढून ठेवा. ही साय सामान्य तापमानाला येण्यासाठी १ तास अशीच बाहेर ठेवा. अशा प्रकारे ही साठवलेली साय मऊ होईल.
२. आता गॅसच्या मंद आचेवर पॅन ठेवून तो व्यवस्थित गरम करुन घ्यावा. या पॅनमध्ये ही साय ओतून घ्यावी. चमच्याच्या मदतीने ही साय पॅनमध्ये हलवून घ्यावी. जर या सायीमध्ये गुठळ्या झाल्या असतील तर चमच्याने हलकेच या गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात थोडे दही घालून त्या सायीमध्ये मिक्स करावे. आता हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी जर आपण हे मिश्रण उघडून पहिले तर आपल्याला यात जाडसर सायीचा थर आलेला दिसेल.
३. आता या मिश्रणात बर्फाचे खडे घालून हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. २ ते ३ मिनिटे फेटून घेतल्यानंतर त्यातून लोणी बाहेर पडेल. हे तयार झालेले लोणी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे. आता गॅसच्या मंद आचेवर भांड ठेवून त्यात लोणी घालून चिमूटभर हळद घालावी, आणि शिजवून घ्यावे. अशा प्रकारे आपण साय कमी असली तरी त्यापासून दुप्पट तूप बनवू शकता. हे तयार झालेले घरगुती दाणेदार, रवाळ तूप एका हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करुन ठेवावे.