‘भुजबळांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल’, मनोज जरांगे,पाटील यांचं वक्तव्य
मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा वाकयुद्ध रंगलं आहे. ‘छगन भुजबळ यांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल’, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. ‘मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठ्यात झुंज लावली.
1884 पासूनच्या निजाम कालीन नोंदी आहेत. त्यामध्ये मराठा हेच कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. तुमच्यात आणि आमच्यात भांडण लावून हे एकत्र राहणारे नेते आहोत. मुस्लिमांना आरक्षण कसं नाही देत हेही बघतो. निजामाच्या काळात डुप्लिकेट करण्यात आलेलं आहे”, असं भुजबळ म्हणाले. “आमचीही जमीन तू खातो का? हा आमचा सातबारा आहे. आमच्यात आणि तुमच्यात भांडण भुजबळ लावत आहे. आमच्या पाच पन्नास जागा मिळतील. एसटी आरक्षणांसाठी ताकद लावायला पाहिजे. धनगर नेत्याला मी दुखावलेले नाही. भुजबळांना बैलाची इंजेक्शन द्यावी लागतील. ते आता पागल झालेले आहेत”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, भुजबळ वेडे झाले आहेत. भुजबळांनी ओबीसी नेत्यांचं वाटोळं केलं”, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच “आमचं भांडण तुमच्याशी नाही तर सरकारशी आहे”, असंदेखील जरांगे पाटील म्हणाले. “येवलावाल्याने दबाव आणला तर पालथं करणार”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ते बधिर झालेलं आहे. त्याला काही दिवसांनी बैलांच्या गोळ्या द्याव्या लागणार आहेत. इंतकी इंजक्शनं द्यावी लागतील एवढं ते बधिर झालेलं आहे. त्याच्या कशाच्या नांदी लागता? ते पागल झालं आहे. सर्वात जास्त ओबीसींचं वाटोळं करणारं तेच आहेत. सगळ्या पक्षाचं वाटोळं करणारे तेच आहेत. सर्व ओबीसी नेत्यांचं वाटोळं करणारं ते आहेत”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
“तुला थोडी बुद्धी आहे का? म्हणून मी त्याला म्हणतो जनावरांचे इंजेक्शन द्वावे लागणार आहेत. डॉक्टर एवढ्या टपोऱ्या गोळ्या नरड्यात घालणार आहेत”, अशीदेखील खोचक टीका मनोज जरांगे यांनी केली. “मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध झालंय. आता सत्ताच हस्तगत करायला पाहिजे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“आम्ही एकटेच 50 ते 55 टक्के आहोत. आम्हाला सरकार आरक्षण कसं देत नाही ते बघू. आमचं भांडण तुमच्यासोबत नाही तर सरकारसोबत आहे. बघतो सरकार कसं देत नाही. त्याला म्हणावं येवल्यावाल्याला कितीही दबाव आणा, नाही पालथं केलं तर नाव सांगणार नाही. तू कितीही आडवा ये. सारा भारत एक करतो”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.