जगासमोर नवीन आव्हान ! मांस खाणाऱ्या जीवाणूचा धुमाकूळ, 24 तासात माणसाचा मृत्यू
जगात कोरोना सारख्या महामारीने धुमाकूळ घातला ज्यामध्ये लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोरोनामुळे अनेकांनी आपली जवळची लोकं गमवली. कुठे कुठे तर संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाली. कोरोनाची लस शोधल्यानंतर कोरोनाच्या प्रभाव कमी करण्यात यश आलं.
कोरोनाचं संकट कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा जगाच्या चिंता वाढल्या आहेत. कारण जपानमध्ये एक असा जीवाणू आढळला आहे. जो मांस खातो. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (STSS) असं या प्राणघातक आणि दुर्मिळ आजाराचं नाव असून तो जपानमध्ये वेगाने पसरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आजार मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे होतो आणि त्याचा प्रसार पूर्वीपेक्षा जास्त आहे. देशाची राजधानी टोकियोमध्ये यांचे रुग्ण वाढत आहेत.
48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू
हा आजार अत्यंत धोकादायक बनला असून याचा संसर्ग झाल्यानंतर 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. स्थानिक वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पहिल्या सहामाहीत एकट्या टोकियोमध्ये या आजाराची 145 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणे 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आहेत. या रोगाचा मृत्यू दर सुमारे 30 टक्के आहे.
सहा महिन्यांत 900 हून अधिक प्रकरणे
जपानच्या न्यूज एजन्सीच्या अहवालात असे म्हटले आहे की 2 जूनपर्यंत देशात या आजाराची 977 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मागील वर्षभरात एकूण 941 प्रकरणे नोंदवली गेली होती. पायाच्या जखमा विशेषतः स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संसर्गास संवेदनाक्षम असतात आणि फोडासारख्या छोट्या जखमा एंट्री पॉइंट असू शकतात. अहवालानुसार. वृद्ध रुग्णांमध्ये, संसर्गापासून मृत्यूपर्यंत किमान ४८ तास लागू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, या जीवाणूंमुळे अंग दुखणे आणि सूज येणे, ताप, रक्तदाब कमी होणे यासारखी गंभीर आणि वेगाने वाढणारी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे श्वसनाच्या समस्या, अवयव निकामी होणे आणि मृत्यूपर्यंत पोहोचू शकतात. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना विशेषतः गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराने पुन्हा एकदा जगासमोर नवीन आव्हाने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.