बीड प्रियकरासाठी घर सोडलं; पण त्याने दिला लग्नास नकार, तरुणीने संपवलं आयुष्य

बीड : प्रेमात अनेकदा माणूस योग्य आणि अयोग्य यातील फरकही विसरून जातो. तो समोरच्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतो. अशात ऐनवेळी जर समोरच्या व्यक्तीने साथ सोडली तर मोठा धक्का बसतो.
यातून सावरणं अनेकांसाठी कठीण होऊन जातं. बीडमधून सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. तिने जिल्हा रुग्णालयातच आत्महत्या केली.
प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीडच्या जिल्हा रुग्णालयात घडली. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नेकनूर येथील एका युवतीचे उत्तरेश्वर खंदारे या युवकाशी प्रेमसंबंध होते. याचा कारणामुळे ती घरातून निघून गेली होती. या दरम्यान तिने वडिलांना फोन करुन आपण घरी येणार नसल्याचंही सांगितलं होतं.
तरीही तिचा भाऊ तिला भेटण्यासाठी गेला . यावेळी त्याठिकाणी उत्तरेश्वर खंदारे आणि तरुणीचा वाद सुरु होता. प्रियकराने तिला मारहाण केलेली असल्याने या युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खंदारे याने तुझ्याशी लग्न करणार नाही, असं तरुणीला सांगितलं होतं. तरुणाने लग्नाला नकार दिल्याने तरुणीला मोठा धक्का बसला
यातूनच परंतु तिने बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयातच गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन उत्तरेश्वर खंदारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बीड शहर पोलीस करत आहेत. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.