घरात मोठ्या प्रमाणावर पाली आणि पालींच्या छोटे छोटे पिल्लांचा उपद्रव आहे का? फक्त ‘हे’ साधे आणि सोपे उपाय करा, घरातून पाली होतील गायब
घर छोटे असो किंवा मोठे घराची स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते. नुसती घराच्या आतील स्वच्छताच नाहीतर घराच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे हे आरोग्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचे असते.
त्यामुळे प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात व घर स्वच्छ देखील ठेवत असतात.
परंतु बऱ्याचदा तरी देखील कितीही घराची स्वच्छता केली तरी घरामध्ये आपल्याला काही कीटकांचा वावर दिसून येतो व आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते. अशा कीटकांमध्ये जर आपण पाहिले तर झुरळ, पाली तसेच उंदीर इत्यादी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व यामुळे नुकसान देखील भरपूर होते.
घरांच्या दृष्टिकोनातून बघितले तर उंदीरांमुळे घरातील धान्याच्या पोत्यांपासून तर अनेक वस्तूंचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते व त्यासोबतच पालींचा उपद्रव देखील खूप धोक्याचा असतो. जर अनावधानाने एखाद्या वेळेस स्वयंपाकामध्ये किंवा खाद्यपदार्थांमध्ये जर पाल पडली व अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ जर खाल्ले गेले तर विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.
त्यातल्या त्यात पालींच्या छोट्या पिल्लांचा जास्त उपद्रव बऱ्याच घरांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे प्रत्येकजण घरातून पालींचा सुळसुळाट कमी व्हावा या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या उपाययोजना करतात. परंतु काही केल्या पालींचा उपद्रव कमी होताना आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे या लेखात आपण काही महत्त्वाच्या ट्रिक्स बघणार आहोत ज्यांच्या वापरामुळे घरातील पाली ताबडतोब गायब होण्यास मदत होईल.
हेसाध्याआणिसोपेउपायकरावघरातूनपालीपळवूनलावा
1- कांदावलसणाच्यासालीचावापर– घरामध्ये पाली व पालींचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर असेल व तुम्ही सगळ्या उपाययोजना करून थकले असाल तर यामध्ये तुम्ही कांदा आणि लसणाचा सालींचा वापर करू शकतात. कारण कांदा आणि लसणाच्या तीव्र वास हा सालीमध्ये देखील असतो व या वासाने पाली दूर पळतात. त्यामुळे पालीपासून घराची सुटका होते.
2- नेपथलीनबॉल्स– घरामध्ये पाली व इतर कीटकांचा सुळसुळाट असेल तर तुम्ही नेपथलीन बॉलचा वापर करू शकता. या बॉलच्या वापरामुळे देखील पाली व इतर कीटकांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. या बॉलचा वापर तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा दरवाज्याजवळ करू शकतात व यामुळे पालींपासून घराची सुटका होते.
3- मोराचीपिसे– घरातून पाली हाकलून लावण्यासाठी तुम्ही मोरांच्या पिसांचा सुद्धा वापर करू शकतात. मोराची पिसे तुम्ही घरात ठेवल्यामुळे पाली दूर होण्यास मदत होते व घरात देखील प्रसन्न वातावरण राहते.
4- पुदिनाचावापर– पुदिना हा देखील पाली घराच्या बाहेर घालवून लावण्यासाठी खूप फायद्याचा आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे पुदिनाला येत असलेला तीव्र वास होय. या तीव्र वासामुळे पाली घराच्या बाहेर पडण्यास मदत होते. कारण पुदिन्याच्या पानांचा हा वास पालींना मुळात आवडत नाही व त्यामुळे पाली दूर होण्यास मदत होते.
तसेच तुम्ही घराच्या खिडक्या जर बंद ठेवल्या तरी देखील फायदा मिळतो व घरात जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करावा व कुठे जर अन्नाचे कण पडलेले असतील तर ते उचलून घर स्वच्छ ठेवावे.