क्राईम

दर महिन्याला दुबईला जायची महिला, संशय म्हणून एक्स-रे केला, रिपोर्ट पाहून बसला धक्का


कितीतरी लोक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दुबईला जातात. गुजरातमधील अशीच एक महिला दुबईला गेली. पण ती दर महिन्याला दुबईला जात होती. त्यामुळे सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच सीआयएसएफला तिच्यावर संशय होता.

अखेर एकदा दुबईहून सुरत विमानतळावर आल्यावर थांबवण्यात आलं आणि तिची तपासणी करण्यात आली. त्यानंतर जे समजलं ते धक्कादायक होतं.

गुजरातमधील पारडी येथील ही महिला गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्याला दुबईला जात होती. या महिलेला पकडण्यासाठी ॲडव्हान्स्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम ही विमानतळावर बसवण्यात आलेली ॲडव्हान्स्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम अतिशय उपयुक्त ठरली. कोणत्या प्रवाशाने किती वेळा आणि केव्हा परदेशात प्रवास केला आहे हे ही यंत्रणा लगेच सांगते. या यंत्रणेने दिलेल्या माहितीवरूनच एक महिला दुबईला जाऊन दर महिन्याला सुरतहून दुबईत ये-जा करत असल्याची माहिती कस्टम आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

7 जून रोजी महिलेची विमानतळावर तपासणी

7 जून रोजी ती दुबईहून सुरत विमानतळावर उतरताच तिला थांबवून तिची चौकशी करण्यात आली आहे. दुबईच्या ट्रिपबाबत तिला कोणतंही समाधानकारक उत्तर देता आलं नाही, ती घाबरली. यानंतर तिला एक्स-रे काढायला सांगितलं पण महिलेनं नकार दिला. अखेर तिला कोर्टात सादर करून वैद्यकीय तपासणीची परवानगी घेण्यात आली.

एक्स-रे रिपोर्टमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दोन कॅप्सूल सापडल्या. ज्यात सोनं होतं. ही महिला सोन्याची तस्करी करत होती. तिच्याकडून 41 लाख रुपये किमतीचं 550 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. अधिकारी या महिलेची चौकशी करत आहेत आणि सोन्याच्या तस्करीत आणखी लोकांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

सोन्याची वाढती तस्करी

सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने त्याची तस्करीही वाढली आहे. इतर देशांतून बेकायदेशीररीत्या स्वस्तात सोनं आणण्यासाठी तस्कर रोज नवनवीन पद्धती अवलंबतात. सुरत ते दुबई आणि शारजाहसाठी उड्डाणं सुरू झाल्यानंतर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दीड वर्षात सुरत विमानतळावरून तस्करी केलेलं 37 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button