मृतदेह क्षणभरही एकटा का सोडला जात नाही? जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण
मृत्यू अंतिम सत्य आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. जन्मानंतर काय केले जाते हे आपल्याला माहित आहे. पण मृत्यूनंतर होणाऱ्या विधींपासून आपण दूर राहतो.
मृत्यूपुर्वी जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते. त्याच व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. यात पंचक, संस्कार, अंत्यसंस्कार, मृतदेहाचे स्नान अशा अनेक गोष्टी आपल्या मनात गोंधळ घालतात आणि भितीत रुपांतरीत होतात. अशीच एक भीती मृतदेहाविषयी निर्माण होते. त्यानुसार, मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत मृतदेह क्षणभरही एकटे सोडले जात नाही. यामागे काय कारण आहे, जाणून घेऊया.
मृतदेहाला एकटे का सोडत नाही?
हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. तर मृत व्यक्ती ज्या ठिकाणी राहत होती त्याच ठिकाणी मृतदेह ठेवला जातो. दरम्यान, मृतदेहाला एकटे सोडले जात नाही, त्या ठिकाणी नातेवाईक असतात. या मागचं कारण म्हणजे गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर, मृताचा आत्मा 13 दिवस त्याच्या मृतदेहाभोवती फिरत असतो. तो आत्मा त्याच्या कुटुंबाची, घराची, जगाची आसक्ती सोडू शकत नाही. अशा स्थितीत मृतदेहाभोवती बसलेले कुटुंबीय पाहून त्या आत्म्याला शांती मिळते. तसेच आपण एकटे नसल्याची जाणीव त्या आत्म्याला होते.
पुर्वी जंगली प्राण्यांकडून मृतदेहांवर हल्ला होत असे. आजही एखादे मृतदेह एकटे सोडले तर कुत्रा किंवा मांजर त्याला ओरबाडू शकते. गरुड पुराणानुसार, असं घडणे अशुभ असून मृताच्या आत्म्याला यमलोकाच्या प्रवासात देखील असाच त्रास सहन करावा लागू शकतो.
यासह गरुड पुराणानुसार, रात्रीच्या वेळी मृत शरीरात नकारात्मक शक्ती किंवा वाईट आत्मा प्रवेश करू शकतो. अशा परिस्थितीत केवळ मृत व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनाही समस्या निर्माण होऊ शकते. मृतदेहाजवळ नातेवाईक असल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला बळ मिळतं आणि तो कोणत्याही इतर आत्म्याला मृतदेहामध्ये प्रवेश करू देत नाही.
वैज्ञानिकदृष्ट्या देखील आहे महत्त्व
मृतदेह एकटं न सोडण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. मृतदेहाच्या आत किटक प्रवेश करु नये. तसेच मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून मृतदेहाजवळ कोणी तरी असावं. करण मृत्यूच्या काही क्षणातच मृतदेह कुजण्यास सुरुवात होते. अशा स्थितीत मृतदेहाजवळ असलेले व्यक्ती सतत फुले व अगरबत्ती लावते ज्यामुळे मृतदेहाचा वास येत नाही. तसेच कोणताही कीटक मृतदेहामध्ये प्रवेश करत नाही.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. लोकशाही न्युज24 या माहितीचे समर्थन करत नाही.