मध्यवर्ती व्हीनस कॉर्नरवरील हायप्रोफाईल वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश
मध्यवर्ती व्हीनस कॉर्नर येथील लोटस् प्लाझा बिल्डिंगमधील प्लॅट नं. 404 मध्ये चालणार्या हायप्रोफाईल वेश्या अड्ड्याचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध व शाहूपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी पर्दाफाश केला.
अड्डा मालकीण प्रिया विनायक गायकवाड (रा. सहावी गल्ली, फुलेवाडी, मूळगाव शंभरफुटी, विश्रामबाग, सांगली) हिला जेरबंद करण्यात आले आहे. अड्ड्यातून मुंबईतील 27 वर्षीय पीडितेची सुटका करण्यात आली आहे.
छापा कारवाईनंतर पथकाने फ्लॅटच्या घेतलेल्या झडतीत 4 हजार 200 रुपयांची रोकड, 7 मोबाईल, कंडोम पाकीट, दोन क्यूआर कोड स्कॅनर बोर्ड, एक पॉश मशीन, वही असा 22 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. असे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या साहाय्यक फौजदार मीनाक्षी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयित प्रिया गायकवाड ही गरीब व असाहाय्य महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयास प्रवृत्त करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने भर चौकातील बिल्डिंगमधील प्लॅट नं. 404 मध्ये आज दुपारी छापा घातला. मुंबईतील टिटवाळा येथील पीडित महिला यावेळी फ्लॅटमध्ये आढळून आली. पथकाने संशयित महिलेला ताब्यात घेऊन पीडितेची सुटका केली. महिलेविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.