हिंदू धर्मात मुला-मुलींचे कान का टोचतात? जाणून घ्या महत्त्व
हिंदू धर्मात व्यक्तीच्या जन्मापसून ते मृत्यूपर्यंत विविध 16 संस्कार केले जातात. या संस्कारांपैकी एक म्हणजे कर्णछेदन. या विधीला कर्णभेदन, कान टोचणे असेही म्हटले जाते.
16 संस्कारापैकी हा नववा संस्कार आहे. या विधीमध्ये लहान मुलांचे कान टोचले जातात आणि सोन्याची किंवा चांदीची तार घातली जाते. यासोबतच मुलाच्या कल्याणासाठी मंत्रांचा जप केला जातो. चला जाणून घेऊया कर्णछेदन संस्कार म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय?
काय आहे धार्मिक महत्त्व?
हिंदू धर्मात कर्णछेदन संस्काराला विशेष महत्त्व आहे. धर्मग्रंथानुसार, ज्याच्यावर कर्णछेदन संस्कार झालेला नसतो ते आपल्या नातेवाईकांचे अंतिम संस्कार करण्यास पात्र मानला जात नाही. मान्यतेनुसार, कर्णछेदनामुळे मुलांची बौद्धिक प्रगती, शैक्षणिक विकास होतो. या विधीमुळे मुलांच्या जीवनातून नकारात्मकता आणि समस्या दूर होते. यासह आरोग्यासही याचा लाभ होतो.
कधी केला जातो हा विधी
धार्मिक मान्यतेनुसार, बाळाच्या जन्मानंतर 12 व्या किंवा 16 व्या दिवशी हा विधी केला जातो. पण या काळात हा विधी कराता येत नसेल तर सहाव्या, सातव्या किंवा आठव्या महिन्यातही हा विधी करता येतो. त्याच वेळी, जर हे संस्कार या काळात केले गेले नाहीत, तर ते व्यक्तीच्या जन्माच्या विषम वर्षात म्हणजे तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वर्षी देखील केले जाऊ शकतात.
असा आहे कर्णछेदनाचा विधी
हिंदू धर्मात कर्णछेदन विधी हा शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. शास्त्रानुसार ब्राह्मण आणि वैश्य वर्णांसाठी हा विधी चांदीच्या सुईने केला जातो. तर क्षत्रियांसाठी हा विधी सोन्याच्या सुईने केला जातो. शूद्र वर्णासाठी हा विधी लोखंडी सुईने केला जातो. हा संस्कार करण्यापूर्वी देवाची पूजा केल्यानंतर मुलांच्या कानात भद्रं कर्णेभि: क्षृणयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:। स्थिरैरंगैस्तुष्टुवां सस्तनूभिर्व्यशेमहि देवहितं यदायु:।। हा मंत्र म्हटला जातो. मग प्रथम उजव्या कानात आणि नंतर डाव्या कान टोचले जाते. त्याच वेळी, मुलीच्या कानात प्रथम डाव्या बाजूला आणि नंतर उजवा कान टोचला जोतो. त्यानंतर डाव्या नाकपुडीलाही छेद दिला जातो.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. लोकशाही न्युज 24 या माहितीचे समर्थन करत नाही.