धार्मिक

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं ! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क


आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) काही दिवस उरलेले असतानाच आता वैष्णवांना विठ्ठलभक्तीची ओढ पृथ्वीच्या या वैकुंठाला खुणावतान दिसत आहे.

यंदाची आषाढी किंबहुना इथून पुढं सर्वच दिवस या मंदिरात येऊन विठुरायाचं रुप न्याहाळणं एक खास अनुभूती देऊन जाणार आहे. कारण, जवळपास 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठलाच्या या सुरेख मंदिराचं मूळ स्वरुप नुकतंच समोर आलं आहे.

 

अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू असून नुकतंच मंदिर समितीनं या मंदिराची सुरेख झलक सर्वांपुढे आणली. मंदिर संवर्धनाच्या या कामात नव्यानं करण्यात आलेली सर्व बांधकामं काढत मंदिर पुरातन स्थितीत पुन्हा सर्वांसमोर आणलं जात आहे.

 

पंढरपूरातील मंदिराच्या गाभाऱ्यासमोर सोळ खांबीजवळील हनुमान दरवाजापाशी एक दगड खचलेला आढळला. तो दगड काढून पहिला असता त्या ठिकाणी एक तळघरवजा खोली आढळली. या तळघराच्या निमित्तानं पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

… आणि सारेच भारावले

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरु असताना मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असणारा एक खचलेला दगड हटवताच तिथं एक तळघर आढळून आलं. सध्या पुरातत्वं विभागाचे अधिकारी या तळघराची पाणी करणार असल्याचं सांगितलं जात असून, त्यानंतर पुरातन काळातील बरीच माहिती, रहस्य समोर येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन घेऊन ज्यावेळी आपण हनुमान दरवाजातून बाहेर पडतो तेव्हा तिथं डाव्या हाताशी असणाऱ्या जागेत गुरुवारी मध्यरात्री काम करत असताना दोन खचलेले दगड आढळले. हे दगड हटवले असता तिथं खालच्या बाजूला जाणाऱ्या पायऱ्या आढळल्या

 

विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील तळघर उघडण्यात आलंय.पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत.तर विष्णुबालाजीरुपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती सापडलीये.पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते.त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले. एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. येथे एकूण 6 वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या येथे सापडल्या. तसेच दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर 1 मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. पण या मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे. या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपुर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे. पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर येऊ शकणार आहे.

 

Live लोकसभा निवडणूक निकाल 2024,भारतात पुन्हा कमळ फुलणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button