कॉलेज फेस्टची तयारी सुरू असताना ‘जय श्री राम’ गाणे वाजले; धर्मांधांचा हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला
कर्नाटकातील (Karnatak Jai Shri Ram) बिदरमध्ये केवळ ‘जय श्री राम’ गाणे वाजवल्यामुळे धर्मांधांच्या एका गटाने हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
बुधवार, दि. २९ मे रोजी गुरु नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयात सदर प्रकार घडला. या हल्ल्यात नटराज आणि वीरेंद्र नावाचे विद्यार्थी जखमी झाले असून ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, कॉलेजमध्ये टेक्नो कल्चरल फेस्ट होणार होता. त्या पार्श्वभूमीवर याठिकाणी नृत्याचा सराव सुरू होता. डीजे वाजत असताना स्पीकरवर ‘जय श्री राम’ गाणे लागले. यावर मुस्लिम विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. परिणामी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
याप्रकरणी मुस्लिम समाजातील १७ विद्यार्थी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कॉलेज प्रशासनाने ३० आणि ३१ मे रोजी होणारा टेक्नो-कल्चरल फेस्ट रद्द केल्याची माहिती मिळत आहे. महाविद्यालयाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.