वाडग्यात ठेवलेल्या वीर्यापासून झाला द्रोणाचार्यांचा जन्म, काय आहे संपूर्ण कहाणी?
आचार्य द्रोणाचार्य यांना सर्वच ओळखतात. त्यांच्याविषयी अनेक कथा, गोष्टी चर्चेत असतात. प्रसिद्ध महर्षी भारद्वाज यांचे पुत्र असलेल्या द्रोणाचार्यांचा जन्म कसा झाला हे तुम्हाला माहिती का?
असं म्हटलं जातं आचार्य द्रोणाचार्यांचा जन्म वाडग्यात असलेल्या वीर्यापासून झाला. याविषयी विज्ञान काय सांगते हेही जाणून घेऊया.
असं म्हटलं जातं की, महर्षी भारद्वाजांनी अप्सरा घृताला गंगेत अंघोळ करताना पाहिलं. तिला पाहून ते वेडे झाले. त्यानंतर त्यांनी त्यांचं वीर्य एका वाडग्यात ठेवलं. काही काळानंतर या वीर्यापासून एक बालक जन्माला आलं. त्याचं नाव होतं द्रोणाचार्य. घृताला आचार्य द्रोणाचार्यांची आई म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
द्रोणाच्या जन्माची आणखी एक कथा प्रचलित आहे ती म्हणजे, जेव्हा भारद्वाज अप्सरा घृताकजे आकर्षित झाले तेव्हा त्यांचे शारिरीक संबंध बनवले आणि त्यांना द्रोणाचार्य झाले.
दरम्यान, आचार्य द्रोनाचार्यांना सर्वोत्तम धनुर्धर म्हणून ओळखलं जातं. वडिलांच्या आश्रमात राहून त्यांनी चार वेद आणि शास्त्रांचं ज्ञान घेतलं. द्रोणाचार्य यांचा विवाह कृपाचार्यांची बहीण कृपी हिच्याशी झाला होता, जिच्यापासून त्यांना अश्वत्थामा नावाचा मुलगा झाला. ते कौरव आणि पांडवांचे गुरु होते.
विज्ञानानुसार, माणसाचं स्पर्म 40 वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवू शकतो आणि त्यापासून बाळे होऊ शकतात. याविषयीचे प्रयोग माणूस आणि प्राण्यांवरही झाला आहे.