धार्मिक

बाप्पांचे दोन लग्न का झाले आणि कोण आहे रिद्धी-सिद्धी? जाणून घ्या


हिंदू धर्मात प्रथम पूजनीय देव म्हणून गणपतीला पूजले जाते. स्वत: देवांचे देव महादेवांनी गणपतीला हा मान दिला आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील कोणतेही शुभ कार्य असो सर्वात आधी गणेश पूजा केली जाते.



गणेश पूजनाशिवाय कोणतेच शुभ कार्य सिद्ध होत नाही अशी मान्यता आहे. अशा या गणपतीला बुधवार समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते. गणेश पूजनादरम्यान रिध्दी-सिद्धी यांचीही पूजा केली जाते. रिद्धी-सिद्धी या गणपतीच्या अर्धांगिनी आहेत. चला जाणून घेऊया गणपतीने दोन विवाह का केले आणि काय आहे त्या मागची पौराणिक कथा.

गणपतींनी केला होता ब्रह्मचार्यचा संकल्प

धार्मिक मान्यतेनुसार, गणपती बाप्पाने ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला होता. एकदा गणपती तपश्चर्या करत असताना तुळशीजी बाहेर येतात आणि गणेशजींची तपश्चर्या पाहून प्रसन्न होतात आणि त्यांना गणेशाची मोहिनीही पडते. त्यानंतर तुळशीजींनी गणपतीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी गणपती म्हणाले की, मी ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला आहे, हे ऐकून तुळशीला राग येतो आणि त्यांनी गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही तर दोन विवाह होतील.

रिद्धी-सिद्धी अशा बनल्या गणपतीच्या पत्नी

एका पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाच्या शारीर रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. त्यामुळे गणपतीने देवी-देवतांच्या विवाहात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. यामुळे देवात त्रस्त झाले आणि ब्रह्मदेवाकडे आपल्या समस्या मांडल्या. त्यानुसार, ब्रह्म देवांनी आपल्या दोन मानस मुली रिद्धी आणि सिद्धी यांना गणपतीकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. जेव्हा जेव्हा एखाद्याच्या लग्नाची बातमी गणपतीपर्यंत पोहोचते तेव्हा रिद्धी आणि सिद्धी त्यांचे लक्ष वळवत होते. यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय देवतांचे सर्व विवाह संपन्न झाले, परंतु जेव्हा गणेशाला हे समजले तेव्हा ते रिद्धी आणि सिद्धी यांच्यावर रागावले आणि त्यांना शाप देणार तितक्यात ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी गणपतीसमोर रिद्धी-सिद्धी सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आणि गणपतींनी ते मान्य केले. अशा प्रकारे गणपतीचा विवाह होत त्यांना दोन बायका होत्या. गणपतीला रिद्धी-सिद्धीपासून दोन मुले झाली, त्यांची नावे शुभ आणि लाभ. पौराणिक मान्यतेनुसार गणपतीला आमोद आणि प्रमोद असे दोन नातू आहेत.

गणपती स्तुती मंत्र (Lord Ganesha Mantra)

व्रकतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभाः।
निर्वघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येरुषु सवर्दा।।

ॐ गजाननं भूंतागणाधि सेवितम्, कपित्थजंबू फलचारु भक्षणम्।
उमासुतम् शोक विनाश कारकम्, नमामि विघ्नेश्वर पादपंकजम्।।

श्री गणपतीची आरती (Lord Ganesha Aarti)

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥1॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय.॥2॥

लंबोदर पीतांबर फणीवरबंधना। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥जय.॥3॥

श्री गणेश चालीसा (Ganesh Chalisa)

दोहा

जय गणपती सदगुणसदन, कविवर बदन कृपाल।
विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल॥

चौपाई

जय जय जय गणपती गणराजू। मंगल भरण करण शुभ काजू॥
जय गजबदन सदन सुखदाता। विश्व विनायक बुद्धी विधाता॥
वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन। तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन॥
राजत मणि मुक्तन उर माला। स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला॥
पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं। मोदक भोग सुगंधित फूलं॥
सुंदर पीतांबर तन साजित। चरण पादुका मुनि मन राजित॥
धनि शिवसुवन षडानन भ्राता। गौरी ललन विश्व-विख्याता॥
ऋद्घि-सिद्घि तव चंवर सुधारे। मूषक वाहन सोहत द्घारे॥
कहौ जन्म शुभ-कथा तुम्हारी। अति शुचि पावन मंगलकारी॥
एक समय गिरिराज कुमारी। पुत्र हेतु तप कीन्हो भारी॥
भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा। तब पहुंच्यो तुम धरि द्घिज रुपा॥
अतिथि जानि कै गौरि सुखारी। बहुविधि सेवा करी तुम्हारी॥
अति प्रसन्न है तुम वर दीन्हा। मातु पुत्र हित जो तप कीन्हा॥
मिलहि पुत्र तुहि, बुद्धि विशाला। बिना गर्भ धारण, यहि काला॥
गणनायक, गुण ज्ञान निधाना। पूजित प्रथम, रुप भगवाना॥
अस कहि अन्तर्धान रुप है। पलना पर बालक स्वरुप है॥
बनि शिशु, रुदन जबहिं तुम ठाना। लखि मुख सुख नहिं गौरि समाना॥
सकल मगन, सुखमंगल गावहिं। नभ ते सुरन, सुमन वर्षावहिं॥
शम्भु, उमा, बहु दान लुटावहिं। सुर मुनिजन, सुत देखन आवहिं॥
लखि अति आनन्द मंगल साजा। देखन भी आये शनि राजा॥
निज अवगुण गुनि शनि मन माहीं। बालक, देखन चाहत नाहीं॥
गिरिजा कछु मन भेद बढ़ायो। उत्सव मोर, न शनि तुहि भायो॥
कहन लगे शनि, मन सकुचाई। का करिहौ, शिशु मोहि दिखाई॥
नहिं विश्वास, उमा उर भयऊ। शनि सों बालक देखन कहाऊ॥
पडतहिं, शनि दृग कोण प्रकाशा। बोलक सिर उड़ि गयो अकाशा॥
गिरिजा गिरीं विकल हुए धरणी। सो दुख दशा गयो नहीं वरणी॥
हाहाकार मच्यो कैलाशा। शनि कीन्हो लखि सुत को नाशा॥
तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधायो। काटि चक्र सो गज शिर लाये॥
बालक के धड़ ऊपर धारयो। प्राण, मंत्र पढ़ि शंकर डारयो॥
नाम गणेश शम्भु तब कीन्हे। प्रथम पूज्य बुद्घि निधि, वन दीन्हे॥
बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा। पृथ्वी कर प्रदक्षिणा लीन्हा॥
चले षडानन, भरमि भुलाई। रचे बैठ तुम बुद्घि उपाई॥
धनि गणेश कहि शिव हिय हरषे। नभ ते सुरन सुमन बहु बरसे॥
चरण मातु-पितु के धर लीन्हें। तिनके सात प्रदक्षिण कीन्हें॥
तुम्हरी महिमा बुद्ध‍ि बड़ाई। शेष सहसमुख सके न गाई॥
मैं मतिहीन मलीन दुखारी। करहुं कौन विधि विनय तुम्हारी॥
भजत रामसुन्दर प्रभुदासा। जग प्रयाग, ककरा, दुर्वासा॥
अब प्रभु दया दीन पर कीजै। अपनी भक्ति शक्ति कछु दीजै॥
श्री गणेश यह चालीसा। पाठ करै कर ध्यान॥
नित नव मंगल गृह बसै। लहे जगत सन्मान॥

दोहा

सम्वत अपन सहस्त्र दश, ऋषि पंचमी दिनेश।
पूरण चालीसा भयो, मंगल मूर्ति गणेश॥

टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. लोकशाही न्युज या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button