चीन सरकारने केली देशातील शेवटची मशिद जमीनदोस्त; ५ वर्षात केले संपूर्ण मशिदीचे चिनीकरण

बिजिंग : इस्लामिक कट्टरतावादाचा सामना करण्याच्या नावाखाली ४० वर्षांपूर्वी सुरू झालेले चीनमधील प्रत्येक मशिदीच्या सिनिकायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. अरबी शैलीत बांधलेल्या शेवटच्या मोठ्या मशिदीचा मिनार आणि घुमट काढून ही मशीद चिनी शैलीत बांधण्यात आल्याचे वृत्त आहे.
पूर्वी आणि आताचे बदल चित्रांमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.
२०१९ मध्ये चीनने प्रत्येक इस्लामिक इमारतीचे चीनी शैलीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरच मशिदींमधून घुमट आणि मिनार हटवण्यास सुरुवात झाली आणि पाच वर्षांत देशातील शेवटच्या मशिदीतील मिनार हटवण्याचे कामही पूर्ण झाले. ही शेवटची मशीद दक्षिण-पश्चिम युनान प्रांतातील शादियान येथे होती.
ही मशीद प्रथम मिंग राजवंशाच्या काळात बांधण्यात आली आणि नंतर सांस्कृतिक क्रांतीच्या काळात ती नष्ट झाली आणि नंतर पुन्हा बांधण्यात आली. या वेळी ही मशीद सौदी अरेबियातील मदिना येथे बांधण्यात आलेल्या मशिदीसारखी असावी, याकडे लक्ष वेधण्यात आले होते, मात्र आता पुन्हा एकदा चीनमधील या इस्लामिक इमारतीत बदल करण्यात आले आहेत. ही मशीद इतकी मोठी होती की त्यात १० हजार लोक नमाज पढू शकत होते.
रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षीपर्यंत या मशिदीमध्ये हिरवा घुमट होता ज्यावर अर्धा चंद्रही दिसत होता. याशिवाय प्रत्येक बाजूला चार बुरूज होते. २०२२ मध्येही त्यावर पुन्हा रंगकाम करण्यात आले. पण आता ही मशीद पाहिली तर ती पूर्णपणे चिनी शैलीची इमारत आहे. इस्लामिक इमारती चिनी सभ्यतेप्रमाणे बनवण्याच्या चीनच्या प्रयत्नावर अनेक पाकिस्तानींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पाकिस्तानच्या लोकांचे म्हणणे आहे की जर हेच प्रकार भारतात किंवा इतर कोणत्याही देशात घडले असते तर पाकिस्तानने त्याबद्दल गदारोळ माजवला असता, परंतु चीनने हे कृत्य केले असल्याने त्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना ना त्यांचा धर्म आठवतो ना मुस्लिमांना धोका. पाकिस्तान सरकार या मुद्द्यावर ना तोंड उघडत आहे ना विरोध करत असल्याने देशातील जनताही संतप्त आहे.