उपकारांची परतफेड कर, तु माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

परभणीच्या जिंतूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने परिसरातून एकच संताप व्यक्त होत आहे. सासऱ्यानेच सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेचा पती दारू पिऊन दिवसरात्र नशेत असतो. तो काहीच काम धंदा करत नाही. म्हणून सासऱ्याने पीडितेला पिठाची गिरणी टाकून दिली होती. त्यामाध्यमातून पैसे कमवून ती घर चालवत होती. यावरुन सासऱ्याने तिला सुनावले होते. केलेल्या उपकारांची परतफेड कर म्हणत सासऱ्याने दुपारच्या वेळी घरात कुणी नसताना पीडितेवर अत्याचार केला. तसंच, मी तुझा पूर्ण सांभाळ करेन तु माझ्या पत्नीसारखीच आहेस. याबबात कोणाला सांगू नकोस, असं म्हणत पीडित महिलेला धमकावले.
सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्यानंतर ती खूप धास्तावली होती. मात्र हिंमत न हारता तिने तिने जिंतूर पोलिस स्थानक गाठून रात्री उशीरा सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधम सासऱ्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात संपात व्यक्त करण्यात येत आहे.