पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात !

नवी मुंबईच्या पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. मोठ्या बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी १३ वर्षाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला, जेव्हा तिचे आई-वडील गर्भपात करण्यासाठी तिला वाशी सामान्य रुग्णालयात घेऊन गेले.
यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पीडिताची विचारपूस केली असता तिने सांगितले की, तिच्या लहान भावाने एकत्र पॉर्न पाहिल्यानंतर तिला गरोदर केले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अपयशी ठरले. पण पुढच्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीत मुलीने नकार दिल्यानंतरही मुलाने तिच्यावर बलात्कार केला. पीडिताने मासिक पाळी चुकल्याने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला.
यानंतर पीडिताचे आई-वडिल तिचा गर्भपात करण्यासाठी तिला वाशी येथील सामान्य रुग्णालयात घेऊन गेले, जिथे पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि ३७६ (२) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण खांदेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून बालकल्याण आयोग या प्रकरणी पुढील कारवाईचा निर्णय घेईल.