पतीनं बायकोच्या डोक्यावरचे केस काढले, मग गुप्तांगात भरली मिरची पावडर, कारण..
लखनऊ : हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली. यानंतर तिने विरोध केल्यावर तिचं मुंडण केलं. एवढ्यावरच तो थांबला नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिरची पावडरही भरली.
पीडितेच्या पालकांनी तिला सदरपूर पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आहे.
सदरपूर पोलीस स्टेशन प्रभारी यांना तक्रार देताना मानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी महिलेनं सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह मुस्लीम रितीरिवाजांनुसार महुआ दांडा सदरपूर रहिवासी रिजवान याच्यासोबत झाला होता. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने पती रिजवानने पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. शुक्रवारी पीडितेचा पती रागाने घरी आला आणि शिवीगाळ करू लागला.
पीडितेने आपल्या पतीला शिवीगाळ करणं थांबवण्यास सांगितल्याने त्याने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच काठीने मारहाण केली आणि केस कापण्याच्या मशीनने तिच्या डोक्याचे केस काढून मुंडण केलं. क्रूर पती आणि त्याच्या कुटुंबीयांचं यावरही समाधान झाले नाही.
पुढे त्यांनी पीडितेला तिच्या वागणुकीविषयी टोमणे मारत तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर भरली. माहिती मिळताच तिच्या माहेरच्या लोकांनी पीडितेला पोलीस ठाण्यात आणून तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशन प्रभारी राकेश सिंह यांनी सांगितलं की, तक्रार प्राप्त झाली असून, पीडित महिलेला वैद्यकीय उपचारासाठी सीएचसी बिस्वान येथे पाठवण्यात आलं आहे. हुंड्यासाठी छळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, विनयभंग अशा अनेक गंभीर कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.