Sita Mata Kund : बिहारमध्ये असलेल्या या कुंडात माता सीतेने दिली होती अग्नि परीक्षा, हे पाणी आजही देते चमत्कारी साक्ष
रामायणात वनवास भोगत असताना माता सीतेला रावणाने पळवून नेले. त्यानंतर वानरांची सेना बनवून प्रभू श्री रामांनी रावणाचा आणि त्याच्या लंकेचा वध केला. त्यानंतर आदरपुर्वक माता सीतेला घेऊन ते अयोध्या नगरीत परतले.
पण, अयोध्येत परतल्यानंतरही सीता मातेचा वनवास संपला नव्हता. रामायणातील कथांनुसार, सीता मातेला अयोध्येत अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. जिथे सीता मातेने ही परीक्षा दिली तिथे एक कुंड आहे. ज्याचे पाणी आजही गरम आहे.
होय, रामायणातील पाऊलखुणा दर्शवणाऱ्या इतर ठिकाणांपैकीच बिहारमधील एक कुंड आहे. बिहारमध्ये असलेल्या मुंगेर या ठिकाणी गरम पाण्याचा कुंड आहे. ज्याला सीता माता कुंड असेही म्हणतात.
बिहारच्या मुंगेरमध्ये रामायणाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी एक सीता कुंड आहे. असे मानले जाते की इथे माता सीता निवास करते. तिथे गरम पाण्याचे कुंड तयार झाले आहे त्याचे पाणी नेहमी गरम असते. या ठिकाणाला रामतीर्थ असेही म्हणतात.
या कुंडातील पाणी नेहमीच गरम का असते हे आजही एक गूढच आहे. या परिसरात माता सीताकुंड सोबत जवळच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या नावाने चार कुंड आहेत. परंतु सीताकुंडाचे पाणी नेहमीच गरम असते. तर इतर चार तलावांचे पाणी थंड आहे. हे अजूनही लोकांसाठी न सुटलेले कोडे आहे.
शास्त्रज्ञांनी केले संशोधन
सीता कुंडातील गरम पाण्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक वेळोवेळी येथे संशोधनासाठी येतात. मात्र आजतागायत हे गूढ कोणालाच उकलता आलेले नाही. या तलावाची लांबी आणि रुंदी २० फूट तर तलाव १२ फूट खोल असल्याचे सांगण्यात आले.
शास्त्रज्ञांनी एक चाचणी घेतली होती. त्यात असे सांगण्यात आले की येथील पाणी आठ महिने गरम असते. उन्हाळ्यात येथील पाण्याचे तापमान कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.