‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…
ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेवर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘जरांगे जेव्हा विधानसभेला उभे राहातील माणसं उभे करतील तेव्हा मतदार पुन्हा एकदा विचार करतील आपल्याला काय करायचं आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे ते उभे राहू शकतात.’ असं दानवे यांनी म्हटलं आहे. ते पंढरपुरच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.
नेमंक काय म्हणाले दानवे?
‘मला असं वाटतं या देशाचा मतदार फार सूज्ञ आहे. आणि असा मतदार कोणाच्या हातात देशाला दिल्यावर देश सुरक्षित राहील किंवा जगाच्या पाठिवर आपलं नाव कसं नंबर एकवर दोनवर तीनवर आणेल हे या देशातील मतदारराजा जाणून आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला स्वत:ला विश्वास आहे. आता ज्या निवडणुका होतील त्यामध्ये चारशे पार करून या देशाचे मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. त्यामुळे भाजपाच्या विरोधात कोणी बोललं म्हणजेच ते होत असं नाही.
आज जरांगे बोलतायेत त्याआधीही आमच्या विरोधा बोलणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यामुळे जरांगे जेव्हा विधानसभेला उभे राहातील माणसं उभे करतील तेव्हा मतदार पुन्हा एकदा विचार करतील आपल्याला काय करायचं. त्यांना स्वातंत्र्य आहे ते उभे राहू शकतात. राहिले तर चांगली गोष्ट आहे. आमचं काही मत नाही. अनेक विरोधी पक्ष उभे राहातात. परंतु भारतीय जनता पार्टीला काहीही फरक पडणार नाही,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.