Video मोबाईलचा डिस्प्ले गेल्यावर आता काळजी करु नका; पैसे खर्च न करता फक्त ‘हा’ जुगाड करा

भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील.
सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/C7ECckXoGbw/?utm_source=ig_web_copy_link
याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे. एका तरुणानं चक्क जुगाड वापरून टच खराब झालेल्या मोबाईलचा टच कसा सुरु केला ते एकदा बघाच. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाानं आपला मोबाईल खराब झाल्यावर माऊसच्या मदतीने ऑपरेट करण्यास सुरुवात केली.
मोबाईलला लावला माउस
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलाने मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यावर माऊस लावून मोबाईल चालवायला सुरुवात केली. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की फोन पडल्यानंतर अनेकदा स्क्रीन तुटते, जी एकतर दुरुस्त करावी लागते किंवा पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी नवीन फोन घालावा लागतो. डिस्प्ले तुटल्यानंतर नवीन डिस्प्ले लावावा लागतो जो खूप खर्चीक असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फोनच्या स्क्रीनवर टच न करताही मोबाईल वापरता येतो? हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. होय, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाच्या हातात तुटलेला फोन आहे, जेव्हा त्याला विचारले जाते की तो हा खराब डिस्प्ले असलेला फोन कसा वापरतो, तेव्हा तो त्याच्या खिशातून माउस काढतो आणि त्याला जोडतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो माऊस फोनवरही काम करतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.