ताज्या बातम्या

‘वरात मी घेऊन येईन पण…’ लग्नासाठी तरुणीची अट; ऐकून तरुणांनी रांग लावली


सोशल मीडियावर असंख्य गोष्टी शेअर केल्या जातात. जे कधी मनोरंजक असतात. तर कधी माहिती देतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका तरुणीचा आहे. ज्यामध्ये तरुणीने लग्न करण्यासाठी तरुणांसमोर एक अट ठेवली.

आश्चर्याची गोष्ट अशी ही अट ठेवून देखील या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी तरुणांनी लाईन लावली. काही तरुणं तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच त्या तरुणीशी लग्न करण्यासाठी बसले आहेत.

असे मानले जाते की मंगळ असलेल्या मुली किंवा मुले फक्त मंगळ असलेल्या जोडीदाराशी लग्न करू शकतात, असे झाले नाही तर त्यांचे जीवन संकटांनी भरलेले असेल.

अशा परिस्थितीत अनेकवेळा असे घडते की काही लोकांना त्यांच्या पसंतीचा शुभ जोडीदार मिळत नाही किंवा त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागते. अशाच गोष्टीला कंटाळलेल्या तरुणीने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये तिने सांगितले की. ‘तुम्हाला मंगळ असेल तर सांगा, वरात मी घेऊन येईन, बोला मंगळ आहे?’ ज्याला पाहून लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर जुहीपराशर नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. अनेक तरुणांनी तर या लग्नासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

या तरुणीने खरंच लग्नासाठी सोशल मीडियावर हे शेअऱ केलं की हा फक्त एक मनोरंजनाचा भाग आहे हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button