जनरल नॉलेज

तुमचा आत्मा दुसऱ्या ग्रहावरचा तर नाही ना? ही लक्षणं दिसली तर समजून जा!


काही व्यक्ती दिसायला सामान्य असूनही वेगळ्या असतात. पटकन इतरांमध्ये न मिसळणाऱ्या अशा व्यक्तींना आपण यांच्यातले नाही असं बरेचदा वाटतं. अशा व्यक्ती एखाद्या ठिकाणी गेल्या तरी त्यांना त्या जागेबद्दल आपुलकी वाटत नाही.

अशी काही लक्षणं असलेल्या व्यक्तींना स्टारसीड असं म्हणतात. या स्टारसीड व्यक्ती अशा का वागतात, त्यांच्यात खरोखरच काही वेगळं असतं का व अशा व्यक्तींना कसं ओळखायचं याबाबत जाणून घेऊ या.

स्टारसीड व्यक्तींमध्ये काही विशेष गोष्टी दिसून येतात. या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांना पटकन इतरांमध्ये मिसळता येत नाही, तसंच त्यांना अनेक ठिकाणी उगाचच आलो असं वाटू शकतं. असं म्हणतात, की स्टारसीड व्यक्तींचं परग्रहवासीयांशी काही नातं असतं. ते दुसऱ्या ग्रहावरून आलेले असतात. अशा अनेक व्यक्ती समाजामध्ये आढळतात. त्यांची काही विशेष लक्षणं दिसून येतात.

स्टारसीड म्हणजे काय?
स्टारसीड यांना म्हणजे स्टार पीपल किंवा इंडिगो चिल्ड्रन असंही म्हटलं जातं. ब्रॅड स्टीगर यांनी 1976 साली त्यांच्या गॉड्स ऑफ अ‍ॅक्वेरियस या पुस्तकात ही कल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती. त्यांच्या मते, काही व्यक्ती परग्रहवासी आणि पृथ्वीवरचा माणूस यांच्यापासून तयार झाले आहेत. त्यांचा मूळ जन्म दुसऱ्या एखाद्या ग्रहावर झाला असतो. ते पुन्हा नवा जन्म घेऊन किंवा एखाद्या माणसाच्या शरीरात प्रवेश करून पृथ्वीवर येतात. स्टारसीड असलेल्या व्यक्तींमध्ये काही खास लक्षणं दिसून येतात. इंटरनेटवर त्याबाबत माहिती दिलेली आहे.

बीपी व शरीराचं तापमान
स्टारसीड्स असलेल्या व्यक्तींमध्ये काही गोष्टी सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा वेगळ्या दिसून येतात. अशा व्यक्तींचा रक्तदाब सामान्यपणे कमी असतो. त्यांच्या शरीराचं तापमानही इतरांच्या तुलनेत कमी असतं व शरीर थंड असतं.

एकटं राहणं ऊर्जादायी
इतरांमध्ये मिळून मिसळून राहणं माणसांना आवडतं; पण स्टारसीड व्यक्तींमध्ये तसं असतं. या व्यक्तींना इतरांमध्ये मिसळून राहणं आवडतच नाही. तसं झाल्यास त्यांना यामुळे थकवा येतो. त्यामुळे स्टारसीड व्यक्ती नेहमी एकांतात राहतात. एकटं राहिल्यानं त्यांना ऊर्जादायी वाटतं.

एका ठिकाणी राहत नाहीत
सामान्यपणे काही वर्षं किंवा काही महिने एकाच ठिकाणी राहिल्यावर आपले त्या ठिकाणाशी भावनिक बंध जुळले जातात; पण स्टारसीड व्यक्तींचं तसं नसतं. ते कोणत्याही भौतिक गोष्टीत किंवा एखाद्या ठिकाणी अडकत नाहीत. त्यांना सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला आवडतं. नवनवीन ठिकाणं पाहायला आवडतात. हिरवळ, नद्या, पर्वत अशा निसर्गसंपन्न ठिकाणी जायला त्यांना आवडतं.

आयुष्याचं ध्येय सतत शोधतात
अशा स्टारसीड व्यक्ती यशस्वी झाल्या, तरी त्यांना त्यांच्या जीवनात काही तरी मिळवायचं असतं. ते सतत जीवनाचं ध्येय शोधण्याच्या मागे असतात. भौतिक सुख-समृद्धी, यश हे त्यांना महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे मानसिक व भावनिक पातळीवर ते सतत अस्थिर असतात.

सहानुभूती व अंतर्ज्ञान
स्टारसीड व्यक्तींना इतरांच्या भावना आणि परिस्थिती समजून घेता येते. तसंच त्यांची अंतर्ज्ञानाची जाणीवही सशक्त असते. इतरांचं मन जाणून घेण्याची शक्ती या स्टारसीड व्यक्तींना भावनिक पातळीवर थकवते. त्यामुळेच अशा व्यक्ती जास्त संवेदनशील असतात.

विज्ञान काय सांगतं?
स्टारसीड व्यक्तींबाबत समाजात मतमतांतरं आहेत; मात्र विज्ञान याला मान्यता देत नाही. स्वतःला परग्रहवासीय मानणाऱ्यांना मानसोपचार तज्ज्ञ मानसिक आजारी व्यक्ती म्हणतात. विज्ञानानं याला मान्यता दिली नाही, तरी स्टारसीड ही संकल्पना खूप लोकप्रिय होते आहे. स्टारसीड या संकल्पनेबाबत सोशल मीडियावरही भरपूर चर्चा होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button