श्री हनुमंतांची पत्नीसोबत पूजा, मंदिराचे महत्त्वही आहे खास, कुठे आहे मंदीर ?
श्री हनुमंतांना आपण बालब्रह्मचारी म्हणून ओळखतो. गावागावतल्या पारावर, मोठ्या मोठ्या मंदिरांच्या बाहेरील कट्ट्यावर मारूतीरायांचा फोटो, मूर्ती पहायला मिळते.
गावागावातही मारूतीरायांची मंदिरे आहेत जिथे मारूतीराय एकटेच असतात. पण आपल्या भारतात असेही एक मंदिर आहे जिथे मारूतीराय त्यांच्या पत्नीसोबत विराजमान आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलेत.
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमानजी आणि त्यांची पत्नी सुरवाचला यांची पूजा केली जाते. येथे बांधलेले हे जुने मंदिर वर्षानुवर्षे लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. स्थानिक लोक जेष्ठ शुद्ध दशमीला हनुमानजींचा विवाह साजरा करतात. मात्र, उत्तर भारतात राहणाऱ्या लोकांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. कारण हनुमानजींना बाल ब्रह्मचारी मानले जाते.
या विवाहामागे अशी आहे पौराणिक कथा
श्री हनुमंतांनी सूर्यदेवाला आपला गुरू मानले होते. सूर्य देवाला ९ दैवी ज्ञान होते. बजरंग बली यांना या सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवायचे होते. सूर्यदेवाने या ९ विद्यांपैकी ५ विद्या हनुमानजींना दिल्या, परंतु उरलेल्या 4 विद्यांबाबत सूर्यासमोर समस्या निर्माण झाली.
उर्वरित ४ दैवी शास्त्रांचे ज्ञान केवळ विवाहित शिष्यांनाच देता आले. हनुमानजी बाल ब्रह्मचारी होते. त्यामुळे सूर्यदेव त्यांना उर्वरित चार शास्त्रांचे ज्ञान देऊ शकले नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी सूर्यदेवाने हनुमंतांना लग्न करण्यास सांगितले.
आधी हनुमानजी लग्नाला तयार नव्हते. पण त्यांना उरलेल्या ४ विद्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी ते लग्नाला तयार झाले, अशी कथा पुराणात आहे.
हनुमंतांची संमती मिळाल्यानंतर सूर्यदेवाने शक्तीने एका कन्येला निर्माण केले. तिचे नाव सुवर्चला होते. सूर्यदेवाने हनुमानजींना सुवर्चलासोबत लग्न करण्यास सांगितले. सूर्यदेवांनी असेही सांगितले की, सुवर्चलासोबत लग्न करूनही तू नेहमीच बाल ब्रह्मचारी राहशील, कारण लग्नानंतर सुवर्णचला पुन्हा तपश्चर्येत मग्न होईल.
हिंदू मान्यतेनुसार, सुवर्चलाचा जन्म कोणत्याही गर्भातून झाला नाही, त्यामुळे तिच्याशी लग्न करूनही हनुमानजींच्या ब्रह्मचर्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही. आणि बजरंग बलीला नेहमी ब्रह्मचारी म्हटले जाते.