Video’हे’ अनोखं मंदिर, जिथे गेल्यावर लोकांना होतो पश्चाताप ! भाविक अक्षरशः रडतात, काय आहे सत्य ?
तुम्ही कोणत्याही धर्मातील मंदिरात जा.. तिथे गेल्यावर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मन:शांती मिळते. ताण-तणावापासून मुक्तता मिळते, भगवंताचे नामस्मरण केल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मनाला, शरीराला लाभते.
चीनमध्ये (China) असे एक मंदिर आहे. जिथे गेल्यानंतर अनेक लोकांना पश्चाताप होतो. असं म्हणतात की इथले भाविक अक्षरश: रडतात, यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, सत्य नेमकं काय आहे? जाणून घ्या..
कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही..!
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आयुष्यात जगातील कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मंदिरातून परतल्यानंतर लोक जवळजवळ रडत आहेत. हा व्हिडीओ शेजारील देश चीनमधील आहे. इथे असं एक मंदिर आहे, जिथे लोक जातात, पण तिथून परतल्यावर त्यांना खूप पश्चाताप होतो. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या मंदिरातून परतल्यानंतर लोक नीट उभे देखील राहण्याच्या स्थितीत नसतात. या मागचे कारण जाणून घेऊया.
मंदिरात गेल्यावर भाविक पश्चाताप करतात!
चीनमध्ये ‘माउंट तैशान’ नावाच्या ठिकाणी एक मंदिर आहे. येथे जाण्यासाठी लोकांना 6600 हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. बरं.. इथून वर चढून गेल्यावर माणसाची अवस्था अशी होते की, त्याचा पाय अक्षरश: शरीरातून गायब झाल्यासारखा वाटतो. त्याचे गुडघे थरथर कापतात आणि इथल्या लोकांची अवस्था चक्क रडण्यासारखी होते. सध्या या मंदिराशी संबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक संघर्ष करताना दिसत आहेत. कोणी रेलिंग धरून पायऱ्या उतरत आहे तर कोणी काठी धरून चालत आहे. तर काही लोक पायी गेले, पण स्ट्रेचरवर उतरल्याचं चित्र दिसत आहे.
व्हिडीओ व्हायरल
Taishan in China.
There are 7,200 steps, and it takes 4 to 6 hours to reach the top, so many people who come here thinking of sightseeing end up regretting it. pic.twitter.com/8Zc3qBPzdL— Figen (@TheFigen_) April 18, 2024
चीनच्या या मंदिर परिसरातील हा व्हिडिओ X वर @TheFigen नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत 2.5 कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले- या ठिकाणी जाण्याचे धाडस कोण करू शकते? तर काही यूजर्सनी लिहिले की, इथे पोहोचण्यापूर्वी एक व्यक्ती शंभर वेळा विचार करेल.
वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. लोकशाही न्युज24 यातून कोणताही दावा करत नाही.