तिसऱ्या महायुद्धाचा पाया ! २०२४ हे वर्ष धोकादायक ठरणार. मोठा विनाश ?

युरोप आणि मध्यपूर्वेसाठी २०२४ हे वर्ष धोकादायक ठरणार आहे. पृथ्वीच्या या दोन भागांत घडणाऱ्या घटना लवकरच तिसऱ्या महायुद्धाचा पाया रचतील,’ असे भाकित प्रसिद्ध ज्योतिषी बाबा वांगा हिने केले आहे.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष लवकरच जगाला विनाशाच्या काळात ढकलून देऊ शकतो. आगामी काळात जैविक आणि रासायनिक अस्त्रांचा वापर होण्याचा इशाराही तिने दिला.
फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिषी आणि आधुनिक नॉस्त्रेदमस यांनी २०२४ ते २०२६ हा काळ मानवी इतिहासासाठी अत्यंत घातक आणि धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या वेळी जगात तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि लवकरच जगातील बहुतांश देशांना त्याचा फटका बसेल, ज्यामुळे मोठा विनाश होईल, असे त्यांनी आपल्या भाकितांमध्ये म्हटले आहे.
बाबा वांगा म्हणाली की, हे वर्ष दुःख आणि वेदना घेऊन येईल. युरोपमध्ये दहशतवादी कारवाया वाढतील. तसेच जगात आर्थिक महामंदी येण्याची चिन्हे आहेत. अणुऊर्जा प्रकल्पातील सायबर हल्ला किंवा रेडिएशनमुळे मोठी दुर्घटनाही होण्याची शक्यता आहे.
इस्त्रायलच्या शेजारी देशांशी बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचा इशाराही तिने दिला. युद्धादरम्यान जैविक शस्त्रांसारख्या घातक शस्त्रांचा वापर होण्याची शक्यताही तिने व्यक्त केली. भारत आणि आशियासाठी अशा कोणत्याही धोकादायक परिस्थितीचे संकेत तिने दिले नाहीत.
बाबा वांगा यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला. तिचे पूर्ण नाव वांजेलिया पांदेवा गुश्तेरोवा होते. आंधळी होती, पण तिची भविष्यवाणी अचूक होती. बाबा वांगा हिला आधुनिक काळातील नॉस्त्रेदमस असेही म्हटले जाते.
नॉस्त्रेदमसप्रमाणेच तिनेही आपल्या मृत्यूपूर्वी कित्येक वर्षे येतील, असे भाकित केले होते. त्यांचे अनुयायी आजही या भविष्यवाणी समजून घेण्याचे आणि ही माहिती जगापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.