बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवसपूर्ती म्हणून मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण
भगवानगडावरून मला दिल्ली का ।यमच दिसत राहील अशी आई रेणुकामाता मोहटादेवी चरणी प्रार्थना करते. तसेच बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्या एका जाती धर्माची लोक नसून जाती आणि धर्माच्या भिंतीच्या पलीकडे बीड लोकसभेला माझ्याविरुद्ध दिलेला उमेदवार कुणीही असेल त्या व्यक्तीच्या विचारधारेशी आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची निवडणूक असेल.
असे प्रतिपादन भाजपा नेत्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाथर्डी दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र मोहटादेवी येथे पत्रकार परिषदेत केले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मुंडे समर्थकांनी पाथर्डी ते श्री क्षेत्र मोहटादेवी भव्य रॅली काढत ठिक ठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या साह्याने भव्य दिव्य मोठा हार घालत भगवे स्वागत केले. तसेच मुंडे समर्थक असलेले प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर व डॉ मनोरमा खेडकर यांच्याकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवसपूर्ती म्हणून मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
यावेळी खा सुजय विखे, आ मोनिका राजळे, माजी आ शिवाजीराव कर्डिले यांच्यासाह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती मोहटादेवी देवस्थानच्या वतीने पुजारी बाळासाहेब क्षीरसागर यांनी मुंडे यांचे स्वागत केले.