“मराठीचा समृद्ध वसा वारसा जपून समृद्ध केला पाहिजे ” – शामला पंडित
“मराठीचा समृद्ध वसा वारसा जपून समृद्ध केला पाहिजे ” – शामला पंडित ( दीक्षित )
प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय चिंचवड येथे ” मराठी भाषा गौरव दिन ” साजरा .
प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय चिंचवड आयोजित मराठी दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कवयित्री , लेखिका मा. शामला पंडित ( दीक्षित ) मॅडम, अध्यक्ष कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम मॅडम,मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. गीता कांबळे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या.
सरस्वती पूजन आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रा. गीता कांबळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.
बी.एड प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी “जागर मराठी भाषेचा” हे मराठी भाषेचा गौरव सांगणारे नाटक सादर केले.
त्यात प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधीने तिथल्या बोलीभाषेत बोलत नाटक संवाद स्वरूपात रंगवले.
सहभागी विद्यार्थिनी- तृशांती तांबे, धनश्री परांजपे, हर्षा सपके,सायली देशपांडे, मनीषा मोठे, स्वाती शेलार,अश्विनी वाघमारे, शिल्पा,विद्या,सायली बामनोळकर,मृणाल
प्रमुख अतिथींचे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कवयित्री लेखिका शामला पंडित (दीक्षित ) यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले .
” मराठीचा वसा आणि वारसा संतांनी आपल्याला दिला तो जपला पाहिजे. पुस्तकांशी मैत्री, मातृभाषेचे ऋण ठेवले पाहिजे, दैनंदिन व्यवहारात भाषा शुद्ध बोलली गेली तर भाषा जगेल. ”
महाविद्यालयातर्फे
कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, प्राचार्या कदम मॅडम यांचे आभार,मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. गीता कांबळे तसेच सगळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार.
” नदीसारखी वाहते ती सदा अन्
उभारी मना रोज देते नवी
असो एक वा ते असो जन्म साती
मला एक माझी मराठी हवी”
कार्यक्रमाची सांगता ” वंदे मातरम् ” ने झाली.
सूत्रसंचालन नीलम चिमटे यांनी केले .
आभारप्रदर्शन सायली देशपांडे बी. एड प्रथम वर्ष. यांनी केले .