पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; 21 राज्यातील सर्वाधिक जागांवर होणार मतदान
लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक १०२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये पहिल्या आणि एकाच टप्प्यात मतदान पार पडणार
World Happiness Report 2024
Philippines ranked 53rd.
However among age groups it has a lower ranking among the young group(70th) and 43rd among the old age group. pic.twitter.com/S1DQDPMZ1T— XeusXachina (@DeusXMachina14) March 20, 2024
सर्व राज्यांमध्ये मिळून १०२ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे
पहिल्या टप्प्यासाठी आज २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २७ मार्च आहे. त्यानंतर उरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी २८ मार्च रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.