पोलिसांनी अथक परिश्रम करून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या गँगस्टरला कंठस्नान घातलं
गँगस्टर्सच्या कारवाया मोडीत काढून समाजात भयमुक्त वातावरण राहावं, यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असते. गँगस्टर्सनी पोलिसांवरच हल्ला केल्याच्या घटना आपण ऐकतो, पाहतो.
पंजाबमध्ये अशीच एक घटना घडली. यात एक पोलीस कॉन्स्टेबल हुतात्मा झाले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांनी अथक परिश्रम करून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या गँगस्टरला कंठस्नान घातलं. हा गँगस्टर फरार झाला होता; पण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं.
पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करणाऱ्या गँगस्टरचा पंजाब पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. पोलीस हवालदाराच्या हत्येनंतर पंजाब पोलीस या गँगस्टरचा शोध घेत होते. या गँगस्टरवर 25 हजार रुपयांचं इनामही ठेवण्यात आलं होतं. अखेरीस पोलिसांनी एका चकमकीत त्याचा एन्काउंटर केला आहे.
पंजाबमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या गँगस्टर सुखविंदर राणा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. रविवारी मुकेरियात झालेल्या एका चकमकीत गँगस्टरने वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल अमृतपाल सिंग यांची गोळी झाडून हत्या केली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनी मुकेरियातील भंगाला गावात गँगस्टर सुखविंदर राणाला घेरलं. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.
गोळीबारात सुखविंदर राणा मारला गेला.
होशियारपूर इथल्या मन्सूरपुरामध्ये सीआयए स्टाफचे हवालदार अमृतपाल सिंग यांना गोळी मारून फरार झालेला गँगस्टर सुखविंदर सिंग राणा मन्सूरपुरियाला होशियारपूर पोलिसांनी फरार आरोपी घोषित केलं होतं. त्याच्यावर 25 हजार रुपयांचं इनाम ठेवण्यात आलं होतं. पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत होती. अमृतपाल सिंग यांची हत्या करून सुखविंदर सिंग राणा फरार झाला होता. पोलिसांना पेट्रोल पंपाच्या एका सीसीटीव्ही कॅमेरात सुखविंदर राणा दिसला होता. त्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. घटनेनंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी राणाचा एन्काउंटर केला.