निळ्या रंगाची अंडी कोणती कोंबडी देते? आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरं आहे. निळ्या रंगाची सुद्धा अंडी असतात
अंड म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर पांढऱ्या रंगाची अंडी येतात. पांढऱ्या रंगाची अंडी, त्यांचा आकार आणि स्वाद हे लहानपणापासून आपण पाहत आलो आहोत. पण तुम्हाला कुणी सांगितले की निळ्या रंगाची सुद्धा अंडी असतात तर..?
आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरं आहे. निळ्या रंगाची सुद्धा अंडी असतात. ही अंडी अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये जास्त मिळतात. तसेच तेथील नागरिकांना निळ्या रंगाची अंडी खूप आवडतात सुद्धा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, निळ्या रंगाची अंडी कोणती कोंबडी देते? जाणून घेऊयात या संदर्भात अधिक….
निळ्या रंगाची अंडी देणाऱ्या कोंबडीचे नाव अरूकाना असे आहे. या कोंबड्या चिली या देशात जास्त आढळून येतात. असे म्हटले जाते की, या कोंबड्या 1914 मध्ये स्पॅनिश पशू वैज्ञानिक साल्वाडोर कॅसेलो यांनी चिली येथे पाहिल्या होत्या. Araucania परिसरात या कोंबड्या आढळून आल्याने त्यांना अरूकाना असे नाव देण्यात आले. जाणून घेऊयात या कोंबड्या आणि कोंबड्यांच्या निळ्या रंगांच्या अंड्यांच्या संदर्भात अधिक…
कसा लागला निळ्या रंगाच्या अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा शोध
असे मानले जाते की, 1914 मध्ये स्पॅनिश पशू वैज्ञानिक साल्वाडोर कॅस्टेलो यांनी चिली दौऱ्यात ही कोंबडी पाहिली होती. चिलीच्या Araucania भागात ही कोंबडी दिली होती आणि त्यावरुनच या कोंबडीला अरुकाना किंवा अरोकाना म्हटले जाते. या कोंबडीला कोंबडीची नवीन प्रजाती मानून कॅस्टेलो यांनी जगातील पहिल्या पोल्ट्री काँग्रेसमध्ये याबाबत सांगितले. काही काळानंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की, हे चिकन विविध प्रकारचे घरगुती किंवा गावठी प्रकारातील आहे.
या कोंबडीची अंडी निळ्या रंगाची का?
या कोंबड्यांची अंडी निळ्या रंगाची का असतात हे अद्याप कळू शकलेले नाहीये. पण या कोंबड्यांमध्ये रेट्रोव्हायरसचा धोका सर्वाधिक असतो. हा व्हायरस सिंगल RNA असतो जो कोंबड्यांच्या शरीरात प्रवेश करुन जीनोमची रचना बदलतात. या रेट्रोव्हायरसला EAV-HP म्हणतात. याच्या जनुकांच्या संरचनेत मोठ्या बदलांमुळे कोंबडीची अंडी निळी पडतात. पण व्हायरसची लागण झाल्यानंतरही या कोंबडीची अंडी खाण्यासाठी सुरक्षित मानली जातात.
यामुळेच चिली आणि इतर युरोपियन, अमेरिकन देशांमध्ये या कोंबड्यांना मोठी मागणी आहे. तसेच मोठ्या आवडीने हे चिकन खाल्ले सुद्धा जाते. या कोंबड्यांची किंमत खूप जास्त असते. पण निळ्या रंगाची अंडी देणाऱ्या कोंबड्यांची प्रजनन क्षमता कमी आहे आणि त्यामुळेच त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
या कोंबड्यांची अंडी सुद्धा निळ्या रंगाची
इस्टर एगर चिकन या सुद्धा निळ्या रंगाची अंडी देतात. या मिश्र जातीच्या कोंबड्या असतात. यांची अंडी निळ्या, हिरव्या आणि कधीकधी गुलाबी रंगाची सुद्धा असतात. ही अंडी खाण्यासाठी योग्य मानली जातात. मात्र, अमेरिकन पोल्ट्री असोसिएशनच्या मते, ही अंडी आरोग्यासाठी तितकी फायदेशीर ठरत नाहीत.