छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्या

संभाजीनगरमध्ये हिंदूंवर आरती केल्यामुळे दगडफेक ! रमजान सुरु आहे, आरती करू नका’


छत्रपती संभाजीनगर : रमजानचा पवित्र महिना सुरु आहे, त्यामुळे हनुमान मंदिरात आरती करु नका म्हणून महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरातील कामगार वसाहतीत मुस्लिम जमावाने गोंधळ घातला.

 

त्यांनी तेथील मंदिरात घुसून आरती रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आरतीत सहभागी होणाऱ्यांवर देखील दगडफेक करण्यात आली. या घटनेत ३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करून प्रकरण हाताळले. या घटनेचा निषेध करण्यासाठी १३ मार्च रोजी हिंदू पक्षाने महाआरती केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

चिकलठाणा येथील कामगार कॉलनीतील हनुमान मंदिरात १२ मार्च रोजी नियमित मंगळवारी संध्याकाळची आरती सुरू होती. तेव्हा, मुस्लिम जमावाने मंदिरात प्रवेश केला आणि महिनाभर आरती न करण्याचा इशारा दिला (कारण रमजान चालू आहे). हे ऐकून आरती करणारे संतापले आणि दोन्ही बाजूने आपापल्या प्रार्थना करण्यात आल्या.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या वेळी आणखी काही हिंदू तरुण मंदिरात आरतीसाठी येऊ लागले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे तीन तरुण जखमी झाले.अविनाश बोंद्रे, सागर बंजारे आणि शुभम राठोड अशी जखमी तरुणांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच महिलांना ही मारहाण करण्यात आली. ज्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान घटनेच्या एक दिवसानंतर, हिंसाचाराचा निषेध म्हणून दि. १३ मार्चला महाआरती करण्यात आली. त्यावेळी महाआरतीमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासह १५०० लोक सहभागी झाले होते. दरम्यान याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कृष्णा नागे नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, रजनी गुप्ता, हरिलाल गुप्ता, कृष्णा नागे, राजू रोठे, रामसनाई गुप्ता आणि इतरांवर हल्लेखोरांनी हल्ला केला. तक्रारीत शकील जैनुद्दीन शेख, अकील जैनुद्दीन शेख, अनीस जैनुद्दीन, रफिक जैनुद्दीन शेख, शोएब सलीम कुरेशी आणि अन्य १२ जणांची नावे आहेत. याशिवाय दुसऱ्या तक्रारीत दीपक राजेंद्र चव्हाण, अजय गायकवाड यांच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button